Headlines

म्हैसूरमध्ये 61 वर्षीय 'अभिमन्यू'चा शेवटचा दसरा:26 वर्षे 750 किलो वजनाची सोन्याची अंबारी उचलून चालला; गतवर्षी झाला निवृत्त

जगप्रसिद्ध म्हैसूर दसऱ्यातील ‘जंबो सवारी’मध्ये ६१ वर्षीय ‘अभिमन्यू’ हत्ती यंदा अखेरचा दिसणार आहे. अभिमन्यू २६ वर्षांपासून शाही मिरवणुकीचा भाग राहिला आहे. २००० पासून तो सातत्याने ७५० किलो वजनाचा सोन्याचा अंबारी घेऊन देवी चामुंडेश्वरीच्या मिरवणुकीचे नेतृत्व करत आला आहे. डीसीएफ डॉ. आय. बी. प्रभू गौडा यांनी सांगितले की, नियमांनुसार अभिमन्यू गेल्या वर्षीच निवृत्त झाला आहे. म्हैसूरच्या…

Read Full News

पशुधन योजना सुरू होण्यापूर्वीच 80 कोटींचे 800 बोगस प्रस्ताव:मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेची फक्त घोषणाच, अर्ज स्वीकारले जात नसताना बीडमध्ये बोगस प्रकरणे

शेतकरी, पशुपालकांसाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू नाही. त्यापूर्वीच पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात बनवेगिरी समोर आली आहे. योजनेसाठी 10 लाखांचा प्रस्ताव करून देण्याच्या नावाने वैदेही ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीने शेतकऱ्यांकडून प्रत्येकी 10 हजार रुपये उकळले. तसेच प्रशिक्षण न देताच दीड हजारात बनावट प्रशिक्षण प्रमाणपत्रही दिले. या कंपनीने 80 कोटींचे 800…

Read Full News

पाचोडला 645 मुलींना प्रमाणपत्र, 433 जणींना शिष्यवृत्ती व सायकलचे वितरण:बालविवाह लावल्यास कुणालाही सोडणार नाही- आयुक्त जी. श्रीकांत‎

किशोरवयीन मुलींचे लग्न लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनो, खबरदार! माझ्या विभागात असा प्रकार घडल्यास एकालाही सोडणार नाही, असा सज्जड दम छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिला. बालविवाह हा मुलींच्या भविष्याशी व आरोग्याशी निगडित अत्यंत गंभीर प्रश्न असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासन कठोर कारवाई करेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. पैठण तालुक्यातील पाचोड येथे इन्स्टिट्यूट…

Read Full News

इगतपुरीत पिसाळलेल्या कुत्र्याचा दोन लहान मुलांसह पाच नागरिकांना चावा:चिमुकल्याच्या हाताचे लचके ताेडणाऱ्या पिसाळलेल्या कुत्र्याला पकडले‎

शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. बुधवारी पिसाळलेल्या कुत्र्याने दुकानातून बाहेर पडणाऱ्या चिमुकल्यावर हल्ला करून त्याच्या हाताचे लचके तोडले. परिसरातील नागरिकांनी धाव घेत मोठ्या प्रयत्नांनी मुलाची कुत्र्याच्या तावडीतून सुटका केली. जखमी मुलाला पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. शहरात मोकाट कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ले होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. बुधवारी रेल्वे स्थानकासमोर देवेंद्र…

Read Full News

सिन्नरला मादी तर आनंदपूरला काेंबड्या खाणारा बिबट्या जेरबंद‎:उगले मळ्यात पिंजऱ्यात अडकलेल्या मादीच्या सुटकेसाठी बिबट्याने पिंजऱ्याभोवती फेरी मारत उकरली माती

. शहरालगत मापरवाडी शिवारातील उगले मळा परिसरात गुरुवारी (दि. १५) पहाटे पिंजऱ्यात दीड वर्षांची मादी बिबट्या जेरबंद झाली. पंधरा दिवसांतील हा पाचवा बिबट्या जेरबंद झाला आहे. ८ ऑक्टोबर रोजी ढग्या डोंगराच्या पायथ्याशी दोन बिबटे भरदिवसा फिरताना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले होते. नगरसेवक बाळासाहेब उगले यांच्या पाठपुराव्यानंतर वन विभागाने गट क्र. ८० मध्ये पिंजरा लावला. गुरुवारी…

Read Full News

टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक केल्यास खरेदी-विक्री परवाना रद्द करणार:संचालक अब्दुल जावेद यांनी दिल्या व्यापाऱ्यांना सूचना‎

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरून त्यांची आर्थिक लूट करू नये; अन्यथा संबंधित व्यापाऱ्यांचा खरेदी-विक्री परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी मतदारसंघातील संचालक अब्दुल जावेद सेठ यांनी दिला. गुरुवारी बाजार समितीत आयोजित व्यापाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समितीत व्यापाऱ्यांकडून लूट होत असल्याचा गंभीर आरोप केला…

Read Full News

देवगाव रंगारीतून परदेशात होणार भेंडीची निर्यात:घटस्थापनेच्या मुहूर्तावर लागवडीला प्रारंभ, जानेवारी 2027 मध्ये काढणी‎

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला केवळ स्थानिक किंवा देशांतर्गत बाजारपेठेपुरते मर्यादित न ठेवता, थेट परदेशातील आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्याच्या ध्येयाने देवगाव रंगारी येथे एका नियोजनबद्ध निर्यातक्षम भेंडी उत्पादन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे यंदाचे सीमोल्लंघन परदेशात ही संकल्पना प्रत्यक्ष साकारत मराठवाड्याच्या मध्यवर्ती भागातून जर्मनी, युरोप आणि लंडनच्या नामांकित बाजारपेठांपर्यंत उच्च दर्जाच्या भेंडीची निर्यात करण्याची एक नवी व समृद्ध…

Read Full News

नांदर येथे श्री रेणुकादेवी मंदिरात 15 हजार भाविकांनी घेतले दर्शन:विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, पाचव्या माळेपासून गर्दी वाढणार‎

. पैठण तालुक्यातील नांदर येथील श्री रेणुकादेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास रविवारी घटस्थापनेने भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. या पावन पर्वावर देवीच्या दर्शनासाठी केवळ स्थानिक परिसरातूनच नव्हे, तर संपूर्ण राज्यभरातून हजारो भाविकांची गर्दी उसळत आहे. नवरात्रोत्सवाच्या चार दिवसांत १५ हजार भाविकांनी दर्शन घेऊन महाआरतीचा लाभ घेतला. नांदर येथील रेणुकादेवी मंदिराला पौराणिक व आध्यात्मिक वारसा लाभलेला आहे. एका…

Read Full News

आरोग्य कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा‎:कर्मचाऱ्यांनी दिले राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांना मागण्यांचे निवेदन

फत्तेपूर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी-कर्मचारी महासंघाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना निवेदन सादर करुन मागण्यांवर चर्चा करण्यासाठी तातडीने बैठक आयोजित करण्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचारी २००५ पासून आरोग्य विभागात कार्यरत…

Read Full News

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जास्त भाव देण्याची ग्वाही‎:बारामती ॲग्रो साखर कारखान्याचे यंदा 8 लाख 25 हजार टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा एक महिना आधीच गळीत हंगाम सुरू करण्यात आला आहे. ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त भाव देणार असून, शेतकऱ्यांनी याच कारखान्याला ऊस देऊन विश्वासाचे नाते दृढ करावे, असे आवाहन बारामती ॲग्रो साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी गुरुवारी केले. कारखान्याच्या २०२६-२७ या गळीत हंगामाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. दरम्यान, यंदा ८ लाख २५ हजार…

Read Full News