Headlines

EVM वरून विरोधकांवर प्रफुल पटेलांचा हल्लाबोल:म्हणाले, त्यांच्याच काळात मशीन भारतात आलं, दुष्काळात राजकारण नको

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार प्रफुल पटेल यांनी ईव्हीएम (EVM), मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाची (SIR) प्रक्रिया आणि राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरून विरोधकांवर टीका केली आहे. आज जे राजकीय पक्ष ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करत आहेत, त्यांच्याच यूपीए सरकारच्या काळात ईव्हीएमचा वापर सुरू झाला होता. त्यावेळी ही व्यवस्था योग्य वाटत होती, मग आता तिच्यावर आक्षेप का…

Read Full News

राजपाल यादव म्हणाले- चेक बाऊन्स प्रकरणाची चिंता करत नाही:तिहारमध्ये स्वतःवरही हसायचो, लोकांना हसवायचो

बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव यांनी चेक बाऊन्स प्रकरणाबाबत म्हटले— सर्वोच्च न्यायालय आपले आहे, देश आपला आहे आणि आपण देशाचे आहोत. जो काही निर्णय होईल, तो सर्वांच्या हिताचा असेल. तिहार तुरुंगात असतानाही स्वतःवर हसलो आणि इतरांना हसवले. तणाव तर बालपणापासूनच राहिलेला नाही. राजपाल यादव गुरुवारी रात्री सुमारे ८ वाजता झाशीच्या सिव्हिल लाइन्स परिसरातील एका नव्या दागिन्यांच्या…

Read Full News

आकाश अंबानी म्हणाले- 6G साठी फक्त सॉफ्टवेअर अपडेट करावे लागेल:टॉवर उभारण्याची गरज नाही, 2 दिवसांनी जिओ देशातील सर्वात मोठा IPO आणणार

जिओ प्लॅटफॉर्म्सचे व्यवस्थापकीय संचालक आकाश अंबानी यांनी दावा केला आहे की, भारतात 6G इंटरनेट आले, तेव्हा जिओला त्यासाठी नवीन टॉवर उभारण्याची किंवा नवीन नेटवर्क उभारण्याची गरज भासणार नाही. कंपनी आपल्या जुन्या तंत्रज्ञानाचा आणि नेटवर्कचा वापर करून केवळ सॉफ्टवेअर अपडेटद्वारे 6G सेवा सुरू करेल. म्हणजेच 6G वापरण्यासाठी तुम्हाला मोबाईलमध्ये केवळ एक सॉफ्टवेअर अपडेट करावे लागेल, अगदी…

Read Full News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विद्यार्थ्यांना देणार संविधानाचे धडे:उद्यापासून ‘सुजाण नागरिक-सक्षम भारत’ उपक्रमाला सुरुवात

विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासोबतच लोकशाही मूल्ये, मूलभूत कर्तव्ये आणि सामाजिक न्यायाची जाणीव रुजवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वतीने ‘सुजाण नागरिक-सक्षम भारत’ हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमाचे उद्घाटन उद्या, 16 ऑक्टोबर रोजी मुंबईतील दादर येथील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते या उपक्रमाचा…

Read Full News

मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरणात FDA ची मोठी कारवाई:5 अधिकाऱ्यांचे निलंबन, तुकाराम मुंढे आणि नरहरी झिरवळ यांचा दणका

मालेगावमध्ये जप्त करण्यात आलेल्या तब्बल 252 मेट्रिक टन सुपारीची विल्हेवाट लावल्याच्या प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत विभागातील 5 अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. मंत्री नरहरी झिरवळ आणि अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या स्तरावर ही कारवाई करण्यात आली आहे….

Read Full News

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना 5 हजारांची अग्रिम मदत देण्याची सरकारची तयारी:6 हजार कोटींच्या खर्चाचे गणित, शंभूराज देसाईंनी दिली माहिती

दुष्काळसदृश परिस्थिती, घटते पीक उत्पादन, शेतीचा वाढता खर्च आणि पाणीटंचाईमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना प्रत्येकी 5 हजार रुपये अग्रिम मदत देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, या निर्णयासाठी सुमारे 6 हजार कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. एवढ्या मोठ्या आर्थिक भाराबाबत शासनस्तरावर विचारविनिमय सुरू असल्याची माहिती पालकमंत्री…

Read Full News

Maharashtra School Admission Age Rules; New Criteria From 2027

महाराष्ट्रातील शाळांमध्ये आपल्या पाल्याला प्रवेश देण्याच्या तयारीत असलेल्या पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने पूर्व-प्राथमिक शिक्षणापासून इयत्ता पहिलीपर्यंतच्या प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित करण्यासंदर्भात . राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश प्रक्रियेत बदल केंद्र सरकारने जाहीर केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये बालकांच्या शिक्षणाचा पाया मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यानुसार औपचारिक शालेय…

Read Full News

संजय गांधी, श्रावणबाळ योजनेचे अनुदान तीन महिन्यांपासून रखडले:दसरा-दिवाळी तोंडावर असतानाही निराधार लाभार्थ्यांना आर्थिक संकटाचा सामना

तिवसा तालुक्यात संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेच्या लाभार्थ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून अनुदान मिळालेले नाही. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांचे १५०० रुपये प्रति महिना अनुदान रखडले आहे. यामुळे वृद्ध, विधवा, दिव्यांग आणि निराधार लाभार्थ्यांवर आर्थिक संकट आले आहे. या योजनांमधील सुमारे २०० लाभार्थ्यांना दरमहा २ लाख रुपये वितरित केले…

Read Full News

वारजेतील डॉमिनोज पिझ्झाच्या स्वयंपाकघरात जिवंत झुरळं:मृत झुरळांचे अवशेष; अन्न परवाना निलंबित

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना पिझ्झा खायला आवडतो. मुलांनी हट्ट केल्यानंतर पालकही त्यांना आवडीने पिझ्झा खायला घेऊन जातात किंवा घरी ऑर्डर करतात. मात्र, हा पिझ्झा तयार करताना अन्नपदार्थांच्या स्वच्छतेची आणि सुरक्षिततेची किती काळजी घेतली जाते, हा प्रश्न पुण्यातील एका कारवाईमुळे ऐरणीवर आला आहे. पुण्यातील वारजे परिसरातील डॉमिनोज पिझ्झा आउटलेटच्या स्वयंपाकघरात आणि अन्नपदार्थ साठवण्याच्या ठिकाणी जिवंत झुरळे…

Read Full News

पुणे पदवीधर निवडणुकीवरून मविआत वादाची ठिणगी:ठाकरेंचे फोटो आणि मशाल चिन्ह वापरू नका, विनायक राऊतांचा शरद पवार गटाला इशारा

महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून सुरू असलेला संघर्ष आता प्रचार साहित्याच्या वापरावरून अधिक तीव्र झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो तसेच शिवसेना ठाकरे गटाचे मशाल चिन्ह वापरण्यावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे….

Read Full News