Headlines

तळेगावात इलेक्ट्रिक ट्रक निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन:मुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक; 4 मिनिटांत बॅटरी बदलता येणार, 50 हजार उत्पादनाचे लक्ष्य

तळेगाव येथे इलेक्ट्रिक अवजड ट्रक निर्मिती आणि बॅटरी जोडणीचा प्रकल्प सुरू होणे, ही पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी महत्त्वाची घटना आहे. ‘एनर्जी इन मोशन’च्या या प्रकल्पाची सध्याची वार्षिक उत्पादन क्षमता पाच हजार वाहनांची असून, ती लवकरच ५० हजारांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषण कमी होण्यासोबतच पेट्रोल-डिझेलच्या आयातीवरील परकीय चलनाचा…

Read Full News

पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयाला एमबीबीएसच्या ५० जागांना मान्यता:फडणवीस म्हणाले, महायुती पाचही जागा जिंकेल; दुष्काळग्रस्तांना ५ हजार आगाऊ मदत

पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या ५० जागांना दोन वेळा मान्यता नाकारल्यानंतर आता मान्यता मिळाली आहे. पुणेकरांची मागणी पूर्ण झाली असून, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तयारीबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, भाजप-महायुतीकडून स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे हे उमेदवार मैदानात आहेत. भय्या माने…

Read Full News

पुण्याचे डॉ. वर्धमान कांकरिया जगातील टॉप 50 नेत्रतज्ज्ञांमध्ये:मोतीबिंदू आणि दृष्टीदोष सुधारणा शस्त्रक्रियेतील योगदानाची आंतरराष्ट्रीय दखल

पुण्यातील एशियन आय हॉस्पिटलचे संचालक आणि ख्यातनाम नेत्रतज्ज्ञ डॉ. वर्धमान कांकरिया यांची जगातील सर्वोत्तम ५० नेत्रतज्ज्ञांमध्ये निवड झाली आहे. अमेरिकेतील एक्सपर्टस्केप या संस्थेने त्यांच्या वैद्यकीय संशोधन, वैज्ञानिक योगदान आणि नेत्रचिकित्सा क्षेत्रातील कामगिरीची दखल घेत हा गौरव केला आहे. या यशामुळे पुण्याच्या वैद्यकीय क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. एक्सपर्टस्केप ही संस्था वैद्यकीय संशोधन, वैज्ञानिक…

Read Full News

5 हजारांच्या दुष्काळी मदतीवर फडणवीसांचे विरोधकांना प्रत्युत्तर:एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांवरही मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या 5 हजार रुपयांच्या अग्रीम मदतीवरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, यासाठी सरकारने अग्रीम रक्कम देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘आम्ही खूप मोठी मदत केली आहे, असा दावा करत नाही; मात्र माझ्या बळीराजासाठी हे 5 हजार रुपये…

Read Full News

राहुल अंकिता भंडारीच्या वडिलांसोबत जमिनीवर बसले:प्रियंकांनी आईला मिठी मारली; दुष्यंत गौतम यांना राज्यपाल बनवण्याला विरोध

राहुल गांधी बुधवारी संध्याकाळी इंडिया गेटवर धरणे देत असलेल्या अंकिता भंडारीच्या आई-वडिलांना भेटले. प्रियंकाही त्यांच्यासोबत आहेत. कुटुंबाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे अपील केले आहे की, सीबीआयची चौकशी पूर्ण होईपर्यंत दुष्यंत कुमार गौतम यांची सिक्कीमच्या राज्यपालपदी झालेली नियुक्ती स्थगित करावी आणि ती रद्द करावी. १२ ऑक्टोबर रोजी दुष्यंत गौतम यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती….

Read Full News

मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक:कुणबी प्रमाणपत्रे, 10 टक्के आरक्षण, शैक्षणिक सवलती आणि रोजगाराच्या प्रश्नांवर आढावा

मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राज्य सरकारकडून समन्वयाच्या माध्यमातून सकारात्मक पाठपुरावा सुरू आहे. मराठा समाजातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत नियमित बैठका घेऊन त्यांच्या मागण्यांचा आढावा घेतला जाईल आणि समाजाच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही जलसंपदामंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. मराठा…

Read Full News

देशातील सर्वात मोठा IPO 21 ऑक्टोबरला खुला होणार:JIO 27 कोटी शेअर्सद्वारे ₹30 हजार कोटी उभारणार; 23 ऑक्टोबरपर्यंत बोली लावता येणार

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची डिजिटल सर्व्हिसेस कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सचा IPO 21 ते 23 ऑक्टोबरदरम्यान खुला राहील. कंपनी 27 कोटी शेअर्स जारी करणार आहे. याद्वारे ₹30 हजार कोटी उभारण्याचे तिचे लक्ष्य आहे. अँकर इन्व्हेस्टर्स 19 ऑक्टोबरपासून बोली लावू शकतील एक्सचेंज फाइलिंगनुसार, अँकर इन्व्हेस्टर्स म्हणजेच मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी बोली लावण्याची तारीख 19 ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच…

Read Full News

कोलकात्याच्या रस्त्यांवर इंद्रधनुषी रंग, दावा- बाइकर्स घसरत आहेत:मंत्री म्हणाल्या- अमेरिका-आइसलँडमध्येही रस्ते रंगवले जातात, दुर्गापूजेनंतर काढून टाकू

दुर्गा पूजेपूर्वी कोलकात्यातील रस्ते आणि फ्लायओव्हरवर इंद्रधनुषी रंगांनी चित्रे काढण्यात आली आहेत. दरम्यान, पावसामुळे रंगीबेरंगी रस्त्यांवर बाइकस्वार घसरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. यानंतर रस्ते सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. या वादावर मंत्री अग्निमित्रा पॉल म्हणाल्या की, रस्ते रंगविणे ही काही नवीन गोष्ट नाही. अमेरिका आणि आइसलँडसह अनेक देशांमध्येही असे केले जाते. अडचण होत…

Read Full News

NH-48 Traffic Jam Cleared After Raju Shetti Protest

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील टोलनाक्यावर सुरू असलेले शेतकरी संघटनांचे आंदोलन अखेर संपले आहे. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 (NH-48) वर निर्माण झालेली वाहतूक कोंडी आता दूर झाली असून, दोन्ही बाजूंनी . बेळगाव जिल्ह्यातील टोलनाक्यावर काल सकाळपासून शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. वाहनांच्या लांबच लांब…

Read Full News

राजू शेट्टींचा आंदोलनाचा पवित्रा बदलला:महामार्गावरील ठिय्या थांबवून साखर कारखाने बंद पाडण्याचा इशारा

ऊसाला प्रतिटन 5,500 रुपये दर जाहीर करावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची दिशा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी बदलली आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक रोखून सुरू असलेले आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता ऊसाला अपेक्षित दर जाहीर न करताच गाळप सुरू करणाऱ्या साखर कारखान्यांना लक्ष्य करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मागण्यांकडे सरकार आणि साखर कारखानदारांकडून…

Read Full News