समान नागरी कायद्याला विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकी:राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडी यांची मिरज पोलिसांत तक्रार
समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार इद्रिस नायकवाडी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची घटना समोर आली आहे. समान नागरी कायद्याला विरोध केल्यास तुम्हाला संपवून टाकू, अशा आशयाचे धमकीचे पत्र अज्ञात व्यक्तीने पाठवल्याचे नायकवाडी यांनी सांगितले. या प्रकरणी त्यांनी मिरज शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. धमकीचे पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध पोलिसांकडून सुरू…