Headlines

हुंडाईचा तळेगावात 11 हजार कोटींचा वाहन प्रकल्प सुरू:महाराष्ट्राचा वाहन उत्पादनात 23 टक्के वाटा; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

देशाच्या एकूण वाहन उत्पादनात महाराष्ट्राचा २३ टक्के, तर वाहन निर्यातीत २६ टक्के वाटा आहे. राज्यात उद्योगांच्या विस्तारासाठी दर्जेदार पायाभूत सुविधा वेगाने विकसित करण्यात येत आहेत. वाहन उद्योगातील संधी वाढत असून, त्यासाठी आवश्यक यंत्रणा आणि सुविधा निर्माण केल्या जात आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तळेगाव दाभाडे एमआयडीसी येथे दक्षिण कोरियाच्या हुंडाई कंपनीच्या अत्याधुनिक…

Read Full News

'दृश्यम ३'ची कमाई ५०० कोटींच्या पार:या क्लबमध्ये सामील होणारा अजय देवगणचा पहिला चित्रपट; २०२६ मधील दुसरा हिट चित्रपट ठरला

क्राइम थ्रिलर चित्रपट ‘दृश्यम 3’ ने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 500 कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पा पार केला आहे. 501.80 कोटी रुपयांच्या जागतिक कमाईसह हा अजय देवगणच्या कारकिर्दीतील 500 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होणारा मुख्य अभिनेता म्हणून पहिला चित्रपट ठरला आहे. ट्रेड वेबसाइट सॅकनिल्कनुसार, चित्रपटाने भारतात आतापर्यंत 323.50 कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली आहे. यासह हा 2026 मध्ये…

Read Full News

पुणे ग्रँड टूर रद्द करा, 113 कोटींचा खर्च टाळा:महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट, निधी विकासकामे आणि दुष्काळग्रस्तांसाठी वापरण्याची मागणी

पिंपरी-चिंचवड महापालिकेची खालावलेली आर्थिक परिस्थिती आणि महाराष्ट्रातील संभाव्य दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन यंदाची आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा रद्द करावी. स्पर्धेसाठी प्रस्तावित ११३ कोटी रुपयांचा खर्च टाळून हा निधी शहरातील विकासकामे आणि दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी वापरावा, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती साहेबराव भापकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापौर रवी लांडगे, महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी, स्थायी समिती…

Read Full News

पुण्यात चार लघुपटांतून विकास आणि वन्यजीव संवर्धनाचा मेळ:'द हॅबिटॅट्स ट्रस्ट'चा पुढाकार; संशोधन, नियोजन आणि लोकसहभागातून उपायांचा शोध

विकासाच्या वेगात वन्यजीवांचे अस्तित्व टिकवायचे असेल, तर केवळ संवर्धनाच्या घोषणा करून चालणार नाही. संशोधन, शास्त्रीय नियोजन आणि प्रत्यक्ष कृतीतून विकास व निसर्ग यांचा समतोल साधावा लागेल, हा संदेश ‘द हॅबिटॅट्स ट्रस्ट’ने चार लघुपटांच्या माध्यमातून दिला. ई-स्क्वेअर मल्टिप्लेक्समध्ये आयोजित ‘अनदर वे : फ्रॉम स्टोरीज टू सोल्युशन्स’ या लघुपट प्रदर्शन आणि परिसंवादात १४० हून अधिक चित्रपट निर्माते,…

Read Full News

meerut neela drum murder case saurabh rajpoot muskan sahil verdict Live update photo video

Marathi News National Meerut Neela Drum Murder Case Saurabh Rajpoot Muskan Sahil Verdict Live Update Photo Video शालू अग्रवाल, अश्विनी जौहरी. मेरठ5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मेरठमध्ये प्रियकरासोबत मिळून पती सौरभ राजपूतची हत्या करणाऱ्या मुस्कानला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तिचा प्रियकर साहिललाही न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. शिक्षा सुनावण्यापूर्वी तुरुंगात असलेल्या मुस्कान आणि साहिलला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडण्यात…

Read Full News

साखरेचा दर 50 रुपये किलो, इथेनॉलला 70 रुपये प्रतिलिटर द्या:मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच, राजू शेट्टी ठाम

साखरेची किमान विक्री किंमत प्रतिकिलो 50 रुपये आणि सी-हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा दर प्रतिलिटर 70 रुपये करण्याच्या मागणीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी ठाम आहेत. या दोन प्रमुख मागण्यांवर निर्णय झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोलनाक्यावर सुरू असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी कोल्हापूरच्या प्रादेशिक…

Read Full News

परतूर नगरपरिषदेत माजी नगराध्यक्षांचा राडा:लेखापालाच्या अंगावर 500 रुपयांच्या नोटा उधळल्या, 10 टक्के कमिशनचा आरोप

जालना जिल्ह्यातील परतूर नगरपरिषद कार्यालयात माजी नगराध्यक्ष आणि लेखापाल यांच्यातील वादामुळे खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे नेते आणि परतूरचे माजी नगराध्यक्ष मोहन अग्रवाल यांनी नगरपरिषदेचे लेखापाल रघुराज चव्हाण यांच्या अंगावर 500 रुपयांच्या नोटा उधळल्याचा प्रकार समोर आला आहे. कंत्राटदार आणि व्यावसायिकांची अनामत रक्कम तसेच विविध देयके देण्यासाठी लेखापाल 10 टक्के कमिशन घेत असल्याचा आरोप अग्रवाल यांनी…

Read Full News

11.40 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा दिवाळी बोनस:जन्मतः 40% दिव्यांगांना पेन्शन; केंद्र सरकारचे 3 मोठे निर्णय

केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी रेल्वेतील सुमारे 11.40 लाख पात्र कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस देण्यास मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मते, यासाठी ₹2,009 कोटी खर्च केले जातील. कॅबिनेटने दिव्यांग पेन्शनच्या नियमांमध्येही बदल केला आहे. आता पेन्शनसाठी 80% ऐवजी 40% दिव्यांगत्व आवश्यक असेल आणि पात्रता जन्मापासून लागू होईल. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत…

Read Full News

MPSC Secretary Mahendra Harpalkar Transferred; Saurabh Katiyar Appointed

पेपरफुटी प्रकरणामुळे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला असून, या पार्श्वभूमीवर आयोगात मोठे प्रशासकीय बदल करण्यात आले आहेत. आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी स . दरम्यान, या बहुचर्चित पेपरफुटी प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी राज्य सरकारने न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत केली…

Read Full News

राज्य सरकारचा मोठा निर्णय!:अंगणवाडी सेविकांना 2 हजारांची भाऊबीज, 42 कोटींच्या निधींची तरतूद; मंत्री अदिती तटकरेंची माहिती

यंदाच्या दिवाळीवर दुष्काळाचे मोठे सावट असून राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्य सरकारने 300 हून अधिक तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून शेतातील पिकांचे पंचनामेही पूर्ण करण्यात आले आहेत. बळीराजाला नेमकी मदत कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देत दिवाळीपूर्वीच 5 हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना…

Read Full News