शेफ विष्णू मनोहर यांना इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाचे निमंत्रण:तेल अवीवमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार
नागपूरचे शेफ विष्णू मनोहर नोव्हेंबरमध्ये इस्रायलमधील तेल अवीव येथे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यांना पाककला व सांस्कृतिक परिसंवादासाठी आमंत्रित केले आहे. भारतातून निवड झालेल्या दोन शेफपैकी ते एक आहेत. ‘क्युरेटेड कलिनरी अँड कल्चरल एंगेजमेंट’ या परिसंवादात मनोहर भारतीय खाद्यपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा मांडतील, ज्यामुळे भारतीय खाद्यसंस्कृतीला जागतिक ओळख मिळेल. चार दशकांच्या प्रवासात…