Headlines

भिवंडीत समाजवादी पक्षाला मोठा धक्का:6 नगरसेवकांची तडकाफडकी हकालपट्टी, स्वीकृत सदस्य निवडीवरून पक्षात खळबळ

भिवंडी महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून समाजवादी पक्षात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. पक्षाच्या अधिकृत भूमिकेला विरोध करत स्वीकृत नगरसेवकपदासाठी पक्षाबाहेरील व्यक्तीच्या नावाची शिफारस केल्याचा ठपका ठेवत समाजवादी पक्षाने आपल्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आजमी यांच्या आदेशानंतर शहराध्यक्ष रियाज आजमी यांनी ही कारवाई जाहीर केली. पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप या…

Read Full News

500 कोटींच्या दारूगोळा पुरवठा कराराच्या चौकशीत सीबीआयची कारवाई:पुणे, म्हैसूर, बंगळुरू आणि दिल्लीतील झडतीत 2.23 कोटींची रोकड जप्त

संरक्षण उत्पादन क्षेत्रातील महत्त्वाची सरकारी कंपनी असलेल्या म्युनिशन्स इंडिया लिमिटेडचे (एमआयएल) पुणेस्थित कार्यकारी संचालक अनिल कुमार यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) लाचखोरी आणि संरक्षण उत्पादनाशी संबंधित संवेदनशील माहिती अनधिकृतपणे उघड केल्याच्या आरोपांवरून अटक केली आहे. या प्रकरणात खासगी कंपनी एसएमपीपी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक आणि प्रवर्तक आशीष कंसल तसेच अनिल कुमार यांचे भाऊ बी….

Read Full News

दिल्ली CM रेखा गुप्तांनी रावणाला राम म्हटले:रामलीलेत म्हणाल्या- प्रत्येक रामाला मारावे लागेल; AAPने म्हटले- हा देवाचा अपमान

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या एका विधानावरून वाद निर्माण झाला आहे. खरंतर, आझादपूर येथे रामलीला कार्यक्रमात बुधवारी संध्याकाळी त्यांनी म्हटले- प्रत्येक रामाला मारावे लागेल. AAP नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री सौरभ भारद्वाज यांनी त्यांच्या भाषणातील व्हिडिओचा एक भाग शेअर केला आहे. मुख्यमंत्री रेखा म्हणतात- जोपर्यंत प्रत्येक राम मारला जात नाही, तोपर्यंत समाज स्वच्छ आणि शुद्ध…

Read Full News

नाना पाटेकरांच्या आठवणी सांगताना तुकाराम मुंढे भावुक:‘लव्ह यू बाळा’ म्हणणाऱ्या मित्राच्या आठवणींनी कंठ दाटला

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वासह सामाजिक क्षेत्रातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या नानांनी सामाजिक कार्यातूनही अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण केला. विशेषतः दुष्काळग्रस्त शेतकरी आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदतीचा हात देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न कायम स्मरणात राहतील. नाना पाटेकर यांच्याशी जिव्हाळ्याचे मैत्रीचे नाते असलेले अन्न व औषध…

Read Full News

चिखलदऱ्यात गांजाची शेती; आरोपीसह 2.85 लाखाचा मुद्देमाल जप्त:गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने केली कारवाई

अमरावती जिल्ह्यात ‘ऑपरेशन कवच’ अंतर्गत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. याच मोहिमेत चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ येथे गांजाची शेती करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपी देविदास उर्फ धनराज तुळशीराम सतवासे (वय ४८, रा. आनंद नगर, काटकुंभ) याला पकडले. त्याच्याकडून ५ किलो ७१२ ग्रॅम वजनाचा, २ लाख ८५ हजार ६०० रुपये किमतीचा गांजा…

Read Full News

जर्जर जलवाहिनी फुटली, अमरावतीचा पाणी पुरवठा ऐनवेळी ठप्प:निंभी-पिंपळखुटा दरम्यान बिघाड, गुरुवारीही पाणी मिळण्याची शक्यता कमी

सिंभोरा येथील अप्पर वर्धा धरणातून अमरावती शहराकडे येणारी मुख्य जलवाहिनी बुधवारी सकाळी मोर्शी तालुक्यातील निंभी आणि पिंपळखुटा गावांदरम्यान फुटली. यामुळे अमरावती व बडनेरा उपनगराचा सायंकाळचा पाणी पुरवठा अचानक ठप्प झाला. सकाळी ९.३० वाजता हा प्रकार घडला. जलवाहिनी फुटल्याने अर्धा तास पाणी वाया गेले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने (मजीप्रा) तात्काळ पंपिंग बंद करण्याचे निर्देश दिले. मजीप्राने दुरुस्तीचे…

Read Full News

डॉमिनोजच्या 3 शाखांवर FDAची मोठी कारवाई:खराब अन्न, जळालेले तेल अन् अस्वच्छतेचा पर्दाफाश, परवाने निलंबित

झटपट खाद्यपदार्थांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे पिझ्झा आणि बर्गरसारख्या पदार्थांना ग्राहकांची मोठी पसंती मिळत असली, तरी हे पदार्थ तयार करताना स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, मुंबईतील प्रसिद्ध डॉमिनोज पिझ्झा साखळीच्या तीन शाखांमध्ये तपासणीदरम्यान गंभीर त्रुटी आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कठोर पाऊल उचलले आहे. खराब अन्नपदार्थांचा वापर, वारंवार वापरलेले व जळालेले…

Read Full News

लग्नाची पत्रिका देण्याच्या बहाण्याने घरात घुसून महिलेला लुटण्याचा प्रयत्न:अचलपूरमधील अल करीम कॉलनीत घडली घटना, चाकू जप्त, आरोपी फरार

अचलपूर शहरातील अल करीम कॉलनीत लग्नाची पत्रिका देण्याच्या बहाण्याने घरात घुसून एका महिलेला चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. दोन अनोळखी व्यक्ती घरात शिरल्या. त्यांनी घरातील एका सदस्याचे नाव घेत मित्र असल्याचे सांगितले. लग्नाची पत्रिका देण्याचा बहाणा करून पाणी आणि पेन मागितले. त्यानंतर त्यांनी…

Read Full News

पायी जाणाऱ्या युवकाला दुचाकीची धडक, जागीच मृत्यू:मोर्शीजवळ पाळा-सालबर्डी मार्गावर घडली घटना, दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी

मोर्शीजवळ पाळा-सालबर्डी मार्गावर एका दुचाकीने पायी जाणाऱ्या युवकाला धडक दिली. या घटनेत ३५ वर्षीय विष्णू हरिभाऊ अंभोरे (रा. पाळा) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (१४ ऑक्टोबर) सायंकाळी ७.३० वाजता घडली. विष्णू अंभोरे पायी जात असताना, सालबर्डीहून मोर्शीकडे येणाऱ्या MH 27 DC 3035 क्रमांकाच्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. दुचाकीवर अनुराग कुमरे (३०) आणि…

Read Full News

तिवसा येथे बंद घर फोडून चोरट्यांनी सोने, चांदी, रोख लंपास:कुटुंब प्रसूतीसाठी बाहेर गेले असताना घडली घटना, 10 हजार रुपयेही चोरीला

तिवसा शहरातील लुंबिनी नगरात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे. चोरट्यांनी कपाटातून पाच ग्रॅम सोने, दहा ग्रॅम चांदी आणि दहा हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. ही घटना बुधवारी (१४ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजता उघडकीस आली. प्रतिम माणिकराव यावले यांच्या घरी ही चोरी झाली. यावले कुटुंब पत्नीच्या प्रसूतीसाठी दोन दिवसांपासून अमरावती…

Read Full News