कागजीपुरा तलावातून पाणी घेण्यास परवानगी द्या:वीटभट्टीधारकांची मागणी, चार महिन्यांसाठी पाणी देण्याची निवेदनाद्वारे विनंती
तालुक्यातील ऐतिहासिक कागजीपुरा येथील तलावातून वीटभट्ट्यांसाठी पाणी घेण्यास प्रशासनाकडून तातडीने बंदी घालण्यात आल्याने स्थानिक वीटभट्टीधारक आणि मजूर मोठ्या संकटात सापडले आहेत. गावातील सुमारे ९० टक्के नागरिकांचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर अवलंबून असल्याने तलावातून पाणी घेण्यास पूर्ववत परवानगी देण्यात यावी, अशी आग्रही मागणी वीटभट्टीधारकांनी खुलताबादच्या तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. कागजीपुरा येथील तलावातील पाण्याचा वापर वीटभट्ट्यांसाठी करण्यास प्रशासनाकडून…