Headlines

रेशनसाठी प्राधान्य कुटुंबाची उत्पन्न मर्यादा दोन लाख:‘अंत्योदय’ची दीड लाख करा, इगतपुरीत बंद धान्यपुरवठा एका महिन्यात सुरू करण्याची आगरी सेनेची मागणी

इगतपुरी तालुक्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांचा बंद झालेला धान्यपुरवठा एका महिन्यात पूर्ववत करावा, प्राधान्य कुटुंबाची उत्पन्न मर्यादा २ लाख तर अंत्योदय योजनेच्या उत्पन्न मर्यादेत दीड लाखापर्यंत वाढ करावी, तसेच धान्यपुरवठ्याशी संबंधित तक्रारींचे तातडीन . इगतपुरी तालुका आदिवासीबहुल असून, दुर्गम गावे आणि पाड्यांमध्ये राहणारी अनेक कुटुंबे सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर अवलंबून आहेत. मात्र, तालुक्यातील अनेक शिधापत्रिकाधारक कुटुंबांना स्वस्त धान्य…

Read Full News

बागलाण तालुक्यात मायक्रो फायनान्स कंपन्यांची सक्तीची वसुली त्वरित थांबवा:दुष्काळी परिस्थितीत कर्जदारांना धमकावल्याची वंचित बहुजन आघाडीची तक्रार

बागलाण तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थितीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या महिला कर्जदारांना मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून सक्तीच्या वसुलीसाठी धमकावले जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. या प्रकारांना आळा घालून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदे . दुष्काळसदृश परिस्थितीमुळे उत्पन्नाचे स्रोत ठप्प झाल्याने कर्जाचे हप्ते भरणे कठीण झाले आहे. कर्जाची परतफेड करणे मान्य असले, तरी महिला कर्जदारांना मानसिक त्रास देणे…

Read Full News

ओडिशात अर्नब वादळाने हाहाकार:किनाऱ्यावर धडकल्यानंतर 40 तासांनी अंदमान समुद्रात नवी प्रणाली; यूपी, बिहारसह 8 राज्यांत गारपीट-पाऊस

पश्चिम बंगाल, झारखंड आणि आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे, तर ओडिशामध्ये भीषण पूर आला आहे. चक्रीवादळ ‘अर्नब’ आंध्र प्रदेश आणि यनम किनाऱ्यावर धडकण्याच्या एका दिवसानंतर, गुरुवारी ‘डीप डिप्रेशन’ (तीव्र दाबक्षेत्र) मध्ये रूपांतरित झाले. चक्रीवादळ ‘अर्नब’ कमजोर होऊन दक्षिण छत्तीसगड आणि लगतच्या दक्षिण ओडिशावर ‘डिप्रेशन’ (कमी दाबाचे क्षेत्र) मध्ये रूपांतरित झाले आहे. मात्र, त्याच्या प्रभावामुळे…

Read Full News

भीमाशंकर परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘वृक्षवल्ली टीम’चे तहसीलदारांना निवेदन

सिल्लोड भीमाशंकर परिसरात प्रस्तावित असलेला प्रकल्प आणि त्यासाठी होणाऱ्या वृक्षतोडीविरोधात सिल्लोड येथील ‘वृक्षवल्ली टीम’ आक्रमक झाली आहे. या वृक्षतोडीला तीव्र विरोध दर्शवत टीमच्या वतीने तहसीलदार सागर वाघमारे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनादरम्यान सदस्यांनी तहसीलदारांशी चर्चा करताना सांगितले की, एखादे छोटे झाड मोठे होऊन विकसित होण्यासाठी ८ ते १० वर्षांचा कालावधी लागतो; मात्र ते तोडण्यासाठी काही…

Read Full News

संपत्तीकडे धावणाऱ्या माणसाने सावली देणारी झाडेही तोडली- सोपान महाराज:निसर्गाचे रक्षण करण्याचा उपस्थित भाविकांना महाराजांनी दिला संदेश

आज सर्वजण पैशाच्या मागे धावत आहेत. या पैशाच्या हव्यासापोटी सावली देणारे वृक्षही तोडून टाकले जात आहेत आणि आपण स्वतःच दुष्काळाला आमंत्रण दिले आहे. ईश्वराला जे अभिप्रेत आहे, त्याच्या पूर्णपणे विपरीत आज मानवाची वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन गाथामूर्ती सोपान महाराज टेंभूरकर यांनी केले. कन्नडचे ग्रामदैवत असलेल्या कन्नड-बहिरगाव रोडवरील श्री विश्वमाई रेणुका माता मंदिर संस्थान आणि…

Read Full News

फटाक्यांचा खर्च कमी करूया, शेतकरी कुटुंबांना मदत करूया:खादगावच्या विद्यार्थ्यांचे कंदिलांतून सामाजिक प्रबोधन

दिवाळीचा सण म्हणजे आनंद, प्रकाश आणि उत्साहाची पर्वणी मानली जाते. मात्र, सध्या ग्रामीण भागात दुष्काळाच्या तीव्र झळा बसत असून संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांच्या वेदनांची जाणीव समाजाला करून देण्यासाठी पैठण तालुक्यातील खादगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी एक अनोखा उपक्रम राबविला आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः आकर्षक आकाशकंदील तयार करून त्याद्वारे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचे आवाहन केले…

Read Full News

कारण अस्पष्ट:गंगापूर येथे तरुणाची आत्महत्या, घरात पंख्याला गळफास घेत उचलले टोकाचे पाऊल

माऊलीनगर परिसरात ३२ वर्षीय युवकाने राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २८ ऑक्टोबर रोजी रात्री उघडकीस आली. नारायण हरिकिसन लाहाणे (३२, मूळ रा. वाकोद, ता. फुलंब्री, ह. मु. माऊली नगर, गंगापूर) असे मृताचे नाव आहे. नारायण लाहाणे हे माऊली नगर येथे कुटुंबासह भाड्याच्या घरात राहत होते. ते जामगाव रोडवरील एका सीड्स कंपनीत कामाला…

Read Full News

शिवन्यात बुलढाण्याहून कारमध्ये येणारा 5लाखांचा गुटखा जप्त:गुन्हे शाखेची कारवाई, परराज्यातील कनेक्शनचा तपास पोलिसांकडून सुरू

गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी शिवना येथे कारवाई केली. या कारवाईत कार आणि प्रतिबंधित गुटखा असा १५ लाख १९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सादिक कडू पठाण (३३, रा. तुर्काबाद खराडी, ता. गंगापूर) याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी अजिंठा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे…

Read Full News

मंजुरीअभावी 215 कोटींच्या कामांना ब्रेक; 374 वर्गखोल्यांचे काम रखडले:जि.प.कडे निधी नाही, 66 अंगणवाड्या भरतात उघड्यावर

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या २१५ कोटी रुपयांच्या विकासकामांच्या अंतिम याद्या विहित मुदतीत सादर करूनही, त्यांच्या निधी वितरणाबाबत आणि प्रशासकीय मंजुरी मिळाली नाही. जिल्ह्यातील तब्बल ३७४ धोकादायक शाळा खोल्या पाडून बांधण्याची गरज आहे. कन्नड तालुक्यातील औराळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत धोकादायक स्थितीत असून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. तर जिल्ह्यातील ६६ अंगणवाड्या उघड्यावर भरत असून त्यांची…

Read Full News

वाघूर नदीवर ट्रक नादुरुस्त झाल्यामुळे दोन तास वाहतूक ठप्प:3 किमी रांगा, मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास वाहतूक पूर्ववत करण्यात आले यश

अजिंठ्यापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघूर नदीवरील पुलावर बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एक ट्रक नादुरुस्त झाला. यामुळे दोन्ही बाजूंना तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागून दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली विलास सोनवणे, दिलीप तडवी आणि संजय कोळी यांनी घटनास्थळी धाव घेत रात्री साडेबारा वाजेच्या…

Read Full News