Headlines

चित्रपट निर्माता रामगोपाल वर्माला लीगल नोटीस:29.67 कोटी भरण्यासाठी 30 ऑक्टोबरची अंतिम मुदत; रक्कम न भरल्यास कायदेशीर कारवाई

चित्रपट निर्माता रामगोपाल वर्मा यांना 29.67 कोटी रुपयांची थकबाकी न भरल्याबद्दल कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. चित्रपट निर्मिती कंपनी ‘एकलातांत फिल्म्स’ने ही रक्कम न भरल्याचा आरोप केला आहे. ट्रेड विश्लेषक अतुल मोहन यांच्या ‘कंप्लीट सिनेमा’ या मासिकाच्या 24 आणि 31 ऑक्टोबर 2026 रोजी प्रकाशित झालेल्या अंकांतील सार्वजनिक नोटीसनुसार, कंपनीने रामगोपाल वर्मा यांना 30 ऑक्टोबर 2026…

Read Full News

कुठे विद्यार्थी नाहीत, तर कुठे शिक्षकांची वानवा:मराठी माध्यम शाळा अडचणीत,अक्कलकोट तालुक्यातील जि. प. शाळांची पटसंख्या घटतेय

Marathi News Local Maharashtra Solapur Where There Are No Students, There Is A Shortage Of Teachers; Marathi Medium Schools Are In Trouble, The Number Of Schools In Akkalkot Taluka Is Decreasing अक्कलकोट4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अक्कलकोट स्टेशन अक्कलकोट तालुक्यात जिल्हा परिषद मराठी शाळांची विद्यार्थीसंख्या दिवसेंदिवस घटत असून, काही शाळा विद्यार्थीअभावी बंद पडल्या आहेत. बबलाद येथील…

Read Full News

अनुभवाचा व ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करा- पोकळे:सेवानिवृत्तांना आनंदी जीवन जगण्याचा कानमंत्र; राहाता तालुक्यातील बैठकीला प्रतिसाद

सेवेतून निवृत्ती म्हणजे आयुष्यातून निवृत्ती नव्हे. सेवानिवृत्तांनी कृतिशील राहणे ही जीवन जगण्याची कला असून निवृत्तीनंतरचा काळ आनंदात आणि समाजोपयोगी कार्यात व्यतीत करणे गरजेचे आहे. सेवानिवृत्तांच्या रास्त मागण्या मंजूर होण्यासाठी दबाव गट निर्माण करणे आवश्यक असून त्यासाठी संघटनेची ताकद वाढविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त मुख्य अभियंता मनोहर पोकळे यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या निवृत्ती वेतनधारकांच्या कृतिशील…

Read Full News

भजनांचा सूर अन् जुन्या आठवणींनाही मिळाला उजाळा:पाथर्डीत ज्येष्ठ नागरिक संघाचा कोजागिरी उत्सव उत्साहात, ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्येष्ठ नागरिकांना एकत्र येत आनंदाचे क्षण अनुभवता यावेत परस्परांतील स्नेहबंध अधिक दृढ व्हावेत आणि सामाजिक एकोपा वाढावा, या उद्देशाने ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने आयोजित कोजागिरी पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भजन, गायन आणि विविध सा . ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रामनाथ बंग यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बंग मित्र परिवाराच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…

Read Full News

शालेय क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून घडतात गुणवंत खेळाडू- खुरांगे:जिल्हास्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेचे उत्साहात केले उद्घाटन

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि अहिल्यानगर जिल्हा किक बॉक्सिंग स्पोर्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत १४, १७ आणि १९ वर्षांखालील वयोगटांतील सुमारे ३०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला. यावेळी खुरांगे यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन करताना म्हणाले, शालेय क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून खेळाडू घडत…

Read Full News

गुणवत्ता व परिश्रमावर विश्वास ठेवत ध्येयाकडे वाटचाल करा:विचारवंत विजय कुवळेकर यांचे शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) युगात केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून विद्यार्थ्यांमध्ये दडलेल्या क्षमतांचा विकास करून त्यांना सर्वगुणसंपन्न बनविणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमधील क्षमता ओळखण्यासाठी शिक्षकांकडे निकोप, सकारात्मक आणि स्वागतशील दृष्टी असली पाहिजे. शिल्पकाराप्रमाणे शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडवावे. ज्याचे शिकणे थांबते, त्याचे शिकवणेही थांबते. त्यामुळे विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकांनीही सातत्याने स्वतःला अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन विचारवंत विजय…

Read Full News

ECने 6 राज्यांतील SIR ची मुदत वाढवली:अंतिम यादी आता 30 नोव्हेंबरला; SCने विचारले होते- सध्या निवडणुका नाहीत, मग घाई का

निवडणूक आयोगाने 6 राज्यांतील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचे (SIR) वेळापत्रक बदलले आहे. आयोगाने दिल्ली आणि महाराष्ट्रातील मतदारांना नावे समाविष्ट करून घेण्यासाठी, वगळण्यासाठी किंवा कोणत्याही त्रुटीबाबत दावा-हरकत नोंदवण्यासाठी अतिरिक्त वेळ दिला आहे. दुसरीकडे, आंध्र प्रदेश, हरियाणा, तेलंगणा आणि नागालँडमध्ये नोटिसांच्या निपटाऱ्याचीही अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. नव्या वेळापत्रकानुसार, महाराष्ट्रासह 5 राज्यांमध्ये अंतिम मतदार यादी 30…

Read Full News

कृषी तंत्रज्ञान समजून घेत आधुनिक पद्धतीने शेती करा- डॉ.विलास खर्चे:राहुरी तालुक्यातील गुहा येथे शेतकरी मेळावा उत्साहात, शेतकऱ्यांना मार्गदर्शन

शेतीमध्ये पिकांचे फक्त उत्पादन घेऊन चालणार नाही तर लागवड, खते, निविष्ठा यांच्यावर खूप मोठा खर्च होतो. त्यासाठी पिकांचे लागवडीचे तंत्रज्ञान समजून घेऊन आधुनिक पद्धतीने शेती करण्याची गरज आहे. हरितक्रांतीमुळे धान्याच्या उत्पादनात मोठी क्रांती झाली परंतु जमिनीची सुपीकता कमी झाली. विषमुक्त अन्नाबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढत असून शेतकरी गटांनी आपल्या गटाद्वारे कीटकनाशक अंशमुक्त भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यावर भर…

Read Full News

किरण रिजिजू म्हणाले- हे इतके धोकादायक आहेत, याची कल्पना नव्हती:नसीरुद्दीन शाहांच्या विधानावर म्हणाले- त्यांचे व्यक्तिमत्त्व उशिरा कळले

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या ‘मानसिक नक्षल’ या वक्तव्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, आतापर्यंत ते नसीरुद्दीन शाह यांना केवळ एक कलाकार म्हणून ओळखत होते. मात्र त्यांची विचारसरणी अशी आहे हे त्यांना माहीत नव्हते. गुरुवारी दिल्लीत माध्यमांशी बोलताना रिजिजू म्हणाले- नसीरुद्दीन शाह यांची विचारसरणी अशा प्रकारची आहे, हे मला माहीत…

Read Full News

India Block Mock Parliament Delhi; Kharge, Rahul Gandhi, Meira Kumar

नवी दिल्ली8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक इंडिया ब्लॉक आज दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी मॉक संसद आयोजित करणार आहे. यात राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सार्वजनिक महाभियोग कार्यक्रम राबवतील. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार असतील. खरगे महाभियोगाचा प्रस्ताव मांडतील, तर प्रस्ताव मंजूर होण्यापूर्वी…

Read Full News