उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे रक्त तर एकनाथ शिंदे विचारांचे वारसदार:भविष्यात दोघे एकत्र येऊ शकतात; रवींद्र धंगेकरांचा मोठा दावा
नुकत्याच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर आल्याने राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे. या तिन्ही नेत्यांमधील चर्चेनंतर आता शिवसेना (शिंदे गट) नेते रवींद्र धंगेकर यांनी एक अतिशय मोठा दावा केला आहे. “उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे रक्ताचे वारसदार आहेत,…