राजकीय पक्ष फोडणाऱ्यांना आता स्वतःचे खासदार सांभाळावे लागतील:मुकुल वासनिकांचा मोदी सरकारला इशारा, दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी
देशातील राजकीय परिस्थिती हळूहळू बदलत असून, सत्ताधारी पक्षातील नेते आणि खासदारांमध्येही भविष्यातील राजकीय घडामोडींविषयी चर्चा सुरू झाल्याचा दावा काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यांनी केला आहे. कालपर्यंत इतर राजकीय पक्षांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आता स्वतःचे खासदार टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे सूचक विधान करत त्यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला. याचवेळी निवडणूक…