एमपीएससी सुधारणा समितीच्या सचिवपदी मुंढे- मंत्री शिवेंद्रराजे:आ. राेहित पवार यांच्याशी चर्चेनंतर पुण्यात घाेषणा
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले असून पेपरफुटी प्रकरणाच्या चौकशी, सुधारणा समिती सचिवपदी आयएएस तुकाराम मुंढे यांची नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निरोपानंतर मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी ही मोठी घोषणा केली. आमदार रोहित पवार आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्यात झालेल्या बैठकीत हा तोडगा निघाला. या चौकशी आयोगाच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांची नियुक्ती झाली आहे….