Headlines

राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी शिवसृष्टीला भेट दिली:पुणे येथील शिवसृष्टी प्रकल्पाचे कौतुक करत विजेत्यांना बक्षिसे वाटली

महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आंबेगाव बुद्रुक येथे उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीला राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी आज भेट दिली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नाना जाधव, शिवसृष्टीचे विश्वस्त जगदीश कदम व विनीत कुबेर, सल्लागार मनोज पोचट व संदीप जाधव, शिवसृष्टीचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार व ऋचा लिमये गिरगावकर उपस्थित होते. शिवसृष्टीची माहिती महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमींपर्यंत…

Read Full News

गोरेगाव फिल्म सिटीतील शूटिंग सेटला आग:'एमटीव्ही हसल'च्या महाअंतिम सोहळ्यावेळी उडाली खळबळ, PCR युनिटमध्ये दुर्घटना

सोमवारी मुंबईतील गोरेगाव येथील फिल्म सिटीमधील एका तात्पुरत्या शूटिंग सेटवर आग लागली. ही घटना प्राईम फोकस स्टुडिओच्या मागे असलेल्या तात्पुरत्या सेटवर घडली. दुपारी 4:02 च्या सुमारास आगीची माहिती मिळाली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सायंकाळी 4:55 पर्यंत आग पूर्णपणे विझवण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 100×20 फूट आकाराच्या एका तात्पुरत्या पीसीआर…

Read Full News

तुकाराम मुंढेंच्या FDA चा दिवाळीपूर्वी धडाका:अकोल्यात 1900 किलो मिठाई जप्त, 3 व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) भेसळ आणि निकृष्ट खाद्यपदार्थांविरोधातील कारवाईला वेग दिला आहे. अकोल्यात FDAच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल 1900 किलो मिठाईचा साठा जप्त केला आहे. अहमदाबादहून दोन ट्रकमधून अकोल्यात आणण्यात आलेला हा साठा अस्वच्छ आणि आरोग्यास घातक परिस्थितीत वाहतूक केला जात असल्याचे तपासणीत आढळून आले. जप्त केलेल्या मिठाईची किंमत सुमारे…

Read Full News

Bawankule Slams Congress Over MPSC Politics In Nagpur

“राज्यातील शेतकरी आणि शेतमजूर आज अस्मानी दुष्काळाच्या भीषण संकटात सापडला आहे. काही भागांत तर घरात अन्नाचा दाणा शिल्लक राहील की नाही अशी परिस्थिती आहे. अशा बिकट काळात फटाके फोडणे, ढोल-ताशे वाजवणे, उत्सव करणे किंवा बडेजाव मिरवणे महायुतीला अजिबात शोभत न . नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर…

Read Full News

यूपीत भाजपच्या 8 राज्यसभा उमेदवारांची घोषणा:सर्व नवे चेहरे; राज्यपाल गंगवार यांच्या मुलीला उमेदवारी, मोदींच्या 2 मंत्र्यांना तिकीट मिळाले नाही

उत्तर प्रदेशात भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी सोमवारी दुपारी ८ उमेदवारांची घोषणा केली. सर्व उमेदवार नवीन आहेत. त्यापैकी २ महिला आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळात सहभागी असलेले बी.एल. वर्मा आणि हरदीप सिंह पुरी यांचे तिकीट कापण्यात आले आहे. असे मानले जात आहे की, त्यांची मोदी मंत्रिमंडळातून हकालपट्टी होऊ शकते. उमेदवारांमध्ये २ ब्राह्मण, १ ठाकूर, ३ मागासवर्गीय आणि…

Read Full News

शिवसेना ठाकरे गटाकडून दिलीप घुगेंना उमेदवारी:छत्रपती शिवरायांना अभिवादन करत भरला अर्ज; तर राष्ट्रवादीकडून सतीश चव्हाण रिंगणात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघ महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 चे अधिकृत उमेदवार दिलीप घुगे यांनी आज 5 ऑक्टोंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह…

Read Full News

सुप्रीम कोर्टाने अभिनेता राजपाल यादव यांना फटकारले:म्हटले- तुम्हाला केव्हा तोंड उघडायचे हे कळले पाहिजे, तुमची जागा तुरुंगात आहे

चेक बाउन्सच्या सात प्रकरणांत दोषी ठरलेल्या अभिनेता राजपाल यादव यांना सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दांत फटकारले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही ५ कोटी रुपये जमा न केल्याने न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची नाराज झाले. ते म्हणाले, “या अहंकाराला योग्य जागा दाखवावी लागेल. कधी तोंड उघडायचे, हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. तुमची जागा तुरुंगात आहे.” सर्वोच्च न्यायालयाने राजपाल यादव यांना शेवटची…

Read Full News

रियाध-मुंबई थेट विमानसेवा सुरू:सौदी अरेबियाच्या 'फ्लायडील' एअरलाइनची मुंबईत धडक; मक्का-मदिना जाणाऱ्या प्रवाशांची सोय

सौदीया ग्रुपची कमी खर्चात विमानसेवा देणारी प्रमुख कंपनी ‘फ्लायडील’ने भारत आणि सौदी अरेबिया दरम्यान आपल्या नेटवर्कचा विस्तार करत मुंबई ते रियाध दरम्यान थेट नॉन-स्टॉप उड्डाणे सुरू केली आहेत. जुलैमध्ये हैदराबाद येथे सेवा सुरू केल्यानंतर मुंबई हे फ्लायडीलचे भारतातील दुसरे महत्त्वाचे केंद्र ठरले आहे. नवीन सेवेमुळे दोन्ही देशांतील व्यवसाय, पर्यटन आणि प्रवासाला मोठा वेग मिळणार आहे….

Read Full News

ममता बॅनर्जींची तीन रुग्णालयांना कायदेशीर नोटीस:विचारले- दस्तऐवज सुवेंदू अधिकारींपर्यंत कसे पोहोचले; 2021 मध्ये व्हीलचेअरवर बसून प्रचार केला होता

बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीन रुग्णालयांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ही नोटीस २०२१ मधील त्यांच्या वैद्यकीय नोंदी सार्वजनिक केल्यासंदर्भात आहे. हे दस्तऐवज पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यापर्यंत कसे पोहोचले, असा प्रश्न ममता यांनी विचारला आहे. ही नोटीस ५ ऑक्टोबर रोजी नंदीग्राममध्ये सुरू झालेल्या नव्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर पाठवण्यात आली आहे. वैद्यकीय नोंदी…

Read Full News

12 वर्षांपासून पोलिसांना चकवा देणारा घरफोडीतील फरार आरोपी अखेर जेरबंद:पायधुनी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे ट्रॉम्बेतून केली अटक

घरफोडीच्या गुन्ह्यात गेल्या तब्बल 12 वर्षांपासून पोलिसांना चकवा देत फरार असलेल्या आरोपीला पायधुनी पोलिसांनी अखेर अटक केली. ख्वाजा सलीम शेख (वय 36) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत आरोपीचा ठावठिकाणा शोधून त्याला ट्रॉम्बे येथील पायलीपाडा परिसरातून ताब्यात घेतले. पायधुनी पोलीस ठाण्यात 2014 मध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला…

Read Full News