Headlines

बाणगंगेच्या सुरक्षेसाठी महापालिकेसोबत नागरिकांनीही सहकार्य करावे:मंगलप्रभात लोढांचे आवाहन बाणगंगा तलावाची केली पाहणी; 10 कृत्रिम तलावांची निर्मिती, ऑक्सिजन पंपांची संख्या वाढवणार

वाळकेश्वर येथील ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेल्या बाणगंगा तलावातील मोठ्या प्रमाणातील मासे मृत झाल्याच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सोमवारी बाणगंगा तलावाची पाहणी केली. दूषित पाण्यामुळे जलजीवनावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तलावाची स्वच्छता, पाण्याची गुणवत्ता आणि जलजीवांचे संरक्षण यासाठी महापालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना लोढा यांनी दिल्या. यावेळी महापालिकेच्या डी विभागाचे सहाय्यक…

Read Full News

Praveen Darekar Announces 25000 Crore Target For Mumbai Bank

मच्छिमार बांधव हे मुंबईचे मूळ रहिवासी असून मच्छिमारांसह कष्टकरी आणि सर्वसामान्य घटकांसाठी आगामी काळात मुंबई बँकेमार्फत विशेष योजना आणण्यात येणार असल्याची घोषणा मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी केली. अनुशक्तीनगर येथील मुंब . ट्रॉम्बे, अनुशक्तीनगर आणि परिसरात कष्टकरी, सर्वसामान्य नागरिक, निवृत्त व्यक्ती तसेच मोठ्या संख्येने मच्छिमार बांधव वास्तव्यास आहेत. या घटकांना…

Read Full News

Raj Thackeray Visits Pune MPSC Students Protest

पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभाराविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सोमवारी, 5 ऑक्टोबर रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट दिली. MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू असून . आंदोलनस्थळी पोहोचल्यानंतर राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत त्यांच्या संतापाचा उल्लेख केला. “मी तुमच्या रागात…

Read Full News

संत प्रेमानंद महाराजांच्या शिष्याचा तिसरा व्हिडिओ:आत्महत्येपूर्वी छतावर जाताना दिसले; कपाळावर चंदन, धोतीवर रक्त लागलेले होते

वृंदावनमध्ये संत प्रेमानंद यांचे शिष्य रसिक दुलारी शरण यांच्या आत्महत्येपूर्वीचा तिसरा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये रसिक दुलारी पायऱ्यांवरून छतावर जाताना दिसत आहेत. त्यांच्या कपाळावर चंदनाचे, तर धोतीवर रक्ताचे डाग दिसत आहेत. २५ वर्षीय रसिक दुलारी शरण यांनी २५ सप्टेंबरच्या सकाळी केली कुंज ट्रस्टच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. २६ सप्टेंबर रोजी…

Read Full News

एकनाथ शिंदेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट:तासभर चर्चा, दुष्काळावरही झाली चर्चा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. आगामी विधान परिषद निवडणुका, राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. तसेच संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातही या भेटीत चर्चा झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात…

Read Full News

आकाश आनंद 31 दिवसांनंतर पुन्हा बसपाचे राष्ट्रीय संयोजक:मायावतींनी भाच्याला 3 वेळा पदावरून हटवले, सासऱ्यांनी राजकारण सोडल्यानंतर पद दिले

बसपाच्या प्रमुख मायावती यांनी भाचा आकाश आनंद यांना 31 दिवसांनंतर पक्षाचे राष्ट्रीय संयोजक बनवले आहे. 3 सप्टेंबर रोजी त्यांना पदावरून हटवण्यात आले होते. त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या- आकाशला अजून अधिक प्रगल्भ होण्याची गरज आहे. मायावती यांनी आतापर्यंत 3 वेळा आकाश यांना पदावरून हटवले आहे. तिन्ही वेळा त्यांना पुन्हा पद देण्यात आले. यावेळी आकाश यांच्या सासऱ्यांनी…

Read Full News

भाजप युवा मोर्चाची नवी टीम जाहीर:29 पदाधिकाऱ्यांची नियुक्ती, शंभवी साळेकडे युवती प्रमुखपदाची जबाबदारी

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने युवा मोर्चाची नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार युवा मोर्चाचे प्रभारी सुनील राणे आणि प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी 2026 साठीच्या नव्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. या कार्यकारिणीत एकूण 29 पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. नव्या कार्यकारिणीत 10 उपाध्यक्ष, 4 महामंत्री आणि 8 सचिवांची नियुक्ती करण्यात आली…

Read Full News

सरकारी आश्रमशाळेतील 82 विद्यार्थ्यांचे डोक्यावरील अर्धे केस कापले:मुलं खेळत असल्याने संतापले अधीक्षक, चंद्रपूर जिल्ह्यातील घटना

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील एका सरकारी आश्रमशाळेतील ८२ विद्यार्थ्यांचे अर्धे केस कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी चिमूर तालुक्यातील जांभुळघाट येथील सरकारी माध्यमिक आश्रमशाळेत घडली. आश्रमशाळेतून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी आश्रमशाळेत मुलांचे केस कापले जात होते. त्याचदरम्यान काही मुले खेळत होती. मुलांच्या या वर्तनामुळे अधीक्षक प्रशांत मेश्राम नाराज झाले. त्यांनी रागाच्या भरात ८२…

Read Full News

पुण्यात 1 कोटींवरील घरांची विक्री 32 टक्के वाढली:50 लाखांखालील घरांची मागणी 22टक्के घटली; एकूण विक्री मात्र स्थिर

पुण्यातील निवासी मालमत्ता बाजारपेठेत घरांची विक्री जवळपास स्थिर असली तरी ग्राहकांचा कल महागड्या घरांकडे झपाट्याने वाढत आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या नऊ महिन्यांत पुण्यात ३६ हजार ४०२ घरांची विक्री झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत ३६ हजार ४४७ घरांची विक्री झाली होती. म्हणजेच विक्रीत केवळ ४५ घरांची घट झाली आहे. मात्र, एक कोटी रुपयांपेक्षा अधिक…

Read Full News

पालिकेच्या 27 शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत डिजिटल प्रशिक्षण:राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी आझम कॅम्पसला भेट देऊन पाहणी केली

पुणे महानगरपालिकेच्या २७ शाळांतील गरजू विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (एम.सी.ई. सोसायटी), आझम कॅम्पस आणि डॉ. पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या डिजिटल साक्षरता उपक्रमाची राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे यांनी सोमवारी भेट देऊन पाहणी केली. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षणाची माहिती घेत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या उपक्रमांतर्गत आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना संगणक…

Read Full News