उच्च न्यायालयाने फेटाळली अमरावती जिल्हा बँकेच्या संचालकांची याचिका:मुदतवाढ टळल्याने आता बँकेवर कोणत्याही क्षणी प्रशासक नेमणूक अटळ
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर (एडीसीसी) आता प्रशासकाची नियुक्ती अटळ आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ देण्याची याचिका फेटाळली आहे. न्यायालयाचा आदेश मिळताच सहकार विभाग प्रशासकाची नियुक्ती करेल. न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ रविवार, ४ ऑक्टोबर रोजी संपला होता. वेळेत निवडणूक न झाल्याने सत्ताधाऱ्यांनी…