Headlines

शेंदुरजनाबाजार येथे संत अच्युत महाराजांना हजारो भाविकांनी वाहिली श्रद्धांजली:अभिनेते भारत गणेशपुरे, गायक रघुनाथ कर्डीकर उपस्थित; 'संतबोध' पुस्तकाचे विमोचन झाले.

गुरुमाऊली संत अच्युत महाराजांना शनिवारी श्री क्षेत्र शेंदुरजनाबाजार येथील महासमाधीस्थळी हजारो भाविकांनी मौन श्रद्धांजली वाहिली. ३ ऑक्टोबर रोजी महाराजांचे देहावसान झाले होते. या दिवसाचे स्मरण म्हणून दरवर्षी श्रद्धांजली कार्यक्रम होतो. यावेळी अभिनेते भारत गणेशपुरे आणि गायक रघुनाथ कर्डीकर उपस्थित होते. कर्डीकर यांच्या भक्तीमय गीतांनी वातावरण भावविभोर झाले. कार्यक्रमानंतर महाराजांची आरती आणि सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली….

Read Full News

विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची संख्या 6 वर पोहोचली:शनिवारी 4 जणांनी अर्ज भरले; 6 ऑक्टोबर अर्ज भरण्याची शेवटची तारीख

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी आतापर्यंत ६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. शनिवारी (३ ऑक्टोबर) ४ उमेदवारांनी आपले नामांकन भरले. रविवार, ४ ऑक्टोबर रोजी सुट्टी असल्याने अर्ज दाखल करता येणार नाहीत. शनिवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये अशोक वामन हिवाळे (अपक्ष), दिलीप भीमराव कडू (अपक्ष), गाजी मोहम्मद जाहेरोश (वंचित बहुजन आघाडी) आणि आशिष मनोहर अंबुलकर…

Read Full News

शिक्षकांना मतदानासाठी भर पगारी रजा जाहीर:अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 23ऑक्टोबरला मतदान

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदान करणाऱ्या शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी विशेष भर पगारी रजा जाहीर करण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाने २२ सप्टेंबर रोजी अमरावती आणि पुणे येथील शिक्षक तसेच औरंगाबाद, पुणे व नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या निवडणुकीसाठी…

Read Full News

ऊस गळीत हंगामापूर्वी शंभूराज देसाईंची मोठी मागणी:साखर कारखान्यांना टनामागे 750 रुपयांचे अनुदान द्या, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

राज्यात यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेती क्षेत्रासह साखर उद्योगासमोरही अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. पावसाअभावी अनेक भागांतील ऊस पिकावर परिणाम झाला असून, उभ्या पिकांचे नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत आगामी ऊस गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वीच साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक गणिताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांना प्रतिटन 750 रुपयांचे…

Read Full News

मोर्शीत पंचनामा न करताच अधिकारी निघून गेले, तक्रारदार जखमी:बोगस मासेमारी सदस्यांच्या चौकशीसाठी आले होते अधिकारी, आंदोलकांनी वाहन अडवण्याचा प्रयत्न केला

मोर्शी येथे बोगस मासेमारी सदस्यांच्या चौकशीसाठी आलेले मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी पंचनामा न करताच निघून गेले. त्यांचे वाहन अडवताना एक तक्रारदार जखमी झाला. पाक प्रकल्पावर (तलाव) बोगस सक्रिय सदस्यांवरून हा वाद सुरू आहे. खडका गावातील नागरिकांनी बोगस सदस्यांना रोखण्यासाठी आंदोलन केले आहे. यशस्वी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था, बारगावचे सदस्य सक्रिय नसल्याचा दावा आहे. या मागणीसाठी महिलांनी २५…

Read Full News

एका क्लिकने विचार करायला लावणारी छायाचित्रे: हृदयनाथ मंगेशकर:पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि महापालिकेचा संयुक्त उपक्रम, 9 ऑक्टोबरपर्यंत खुले

एखाद्या क्षणाला कॅमेऱ्यात बंदिस्त करणारी एक ‘क्लिक’ किती व्यापक आशय व्यक्त करू शकते, किती प्रश्न उपस्थित करू शकते आणि किती विचार करायला भाग पाडू शकते, याची प्रचिती पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील वृत्तपत्र छायाचित्रकारांनी टिपलेल्या छायाचित्रांच्या प्रदर्शनातून येत आहे, असे मत ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केले. अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त पुणे श्रमिक पत्रकार संघ…

Read Full News

पाकिस्तानी दहशतवादी नेटवर्कशी संबंधित कर्नाटकातील तरुणाला अटक:व्हॉट्सॲप-इन्स्टाग्रामवर शस्त्र तस्करी आणि विक्रीबाबत संभाषण केल्याचा आरोप

कर्नाटकमधील बिदर येथे दहशतवादी कारवायांच्या आरोपावरून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला तरुण विशाल कुमार मेट्रे (24) पाकिस्तानात असलेल्या दहशतवादी शहजाद भट्टी, राणा हनैन आणि नोमी खान यांच्या संपर्कात होता. गुप्तचर माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. विशाल हा बिदरमधील भालकी तालुक्यातील येनकूर गावचा रहिवासी आहे. तो व्हॉट्सॲप आणि…

Read Full News

पुण्यात 6500 झाडे लावणार, 500 वृक्षांचे पुनर्रोपण:पुणे मनपा-आनंदवन फाउंडेशनचा उपक्रम; कोथरूड डीपी रोडचा मार्ग मोकळा

पुणे महानगरपालिका आणि आनंदवन फाउंडेशन यांनी संयुक्तपणे वृक्षारोपण व पुनर्रोपणाचा उपक्रम हाती घेतला असून, या अंतर्गत पुण्यात ६,५०० नवीन वृक्षांची लागवड आणि ५०० विद्यमान वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. आनंदवन फाउंडेशनने आपल्या देखरेखीखाली असलेल्या सर्व्हे नं. १८ येवलेवाडी येथील ७ हेक्टर जागेवर वृक्षारोपण व पुनर्रोपणाचे काम करण्यासाठी पुणे महानगरपालिकेला संमती दिली आहे. वृक्षारोपण व पुनर्रोपण…

Read Full News

ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेसाठी संशोधनाला प्रोत्साहन आवश्यक:विद्यार्थ्यांना संधी दिल्यासच जागतिक बाजारपेठेत स्पर्धा शक्य: डॉ. विवेक सावंत

जगाची नवीन अर्थव्यवस्था ही ज्ञानावर आधारित असून ज्ञान हाच तिचा कच्चा माल आहे. संशोधन, पेटंट आणि नवोन्मेषाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या बौद्धिक संपत्तीवर आधारित रॉयल्टी ही भविष्यातील अर्थव्यवस्थेची महत्त्वाची ताकद ठरणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना संशोधनासाठी संधी, अत्याधुनिक ज्ञान आणि नवउत्पादनासाठी आवश्यक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. आपली बुद्धिमान मुले परदेशात जाऊन संशोधन करतात आणि त्यातून मिळणारी…

Read Full News

विक्रम शिंगाडेंवरील विनयभंगाच्या गुन्ह्याने माणमध्ये राजकीय वातावरण तापले:म्हसवड पोलीस ठाण्यासमोर अभयसिंह जगतापांचे ठिय्या आंदोलन

माण पंचायत समितीचे सभापती विक्रम शिंगाडे यांच्यासह अन्य आठ जणांविरोधात दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करावी, कोणत्याही राजकीय किंवा अन्य दबावाला बळी न पडता या प्रकरणातील सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, या मागणीसाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अभयसिंह जगताप यांनी म्हसवड पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनानंतर…

Read Full News