फुलंब्री तालुक्यातील 55 पाझर तलाव पावसाअभावी कोरडेच:वाकोद प्रकल्पात 8, फुलंब्री तलावात 31 टक्के साठा
तालुक्यात या वर्षी पावसाने पाठ फिरवल्यामुळे तब्बल चौदा वर्षांनंतर अत्यंत भयंकर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या अपुऱ्या प्रमाणामुळे येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, या भीषण स्थितीने तालुक्यातील अनेक गावांमधील वयोवृद्ध नागरिकांना १९७२ च्या ऐतिहासिक दुष्काळाची आठवण करून दिली आहे. तालुक्यात पावसाची अत्यंत अल्प नोंद झाल्यामुळे येथील एकही मुख्य धरण भरलेले नाही. यामुळे जेवढा…