दिल्लीत कारने वृद्ध दाम्पत्याला उडवले:दोघेही हवेत उडून रस्त्यावर पडले; महिला चालकाला अटक, क्रेटातून उतरून जखमी पाहिले अन् झाली पसार
दिल्लीतील कीर्ती नगरमध्ये मॉर्निंग वॉकवरून घरी परतणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्याला क्रेटा कारने मागून धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, दोघेही हवेत उडून रस्त्यावर जाऊन पडले. हा अपघात आर्य समाज मंदिराजवळ शुक्रवारी सकाळी ८ वाजून ४६ मिनिटांनी झाला. पोलिसांनी शनिवारी घटनेची माहिती दिली. ७९ वर्षीय दयानंद तंगरा आणि ७१ वर्षीय कुसुम तंगरा अशी वृद्ध…