Headlines

बँकॉकहून सौंदर्य प्रसाधनांच्या डब्यातून आणले 1 कोटीचे चरस:पुणे विमानतळावर महिला जेरबंद, तब्बल 1 किलो 243 ग्रॅमचा मुद्देमाल जप्त

सौंदर्य प्रसाधनांच्या आडून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका महिलेला पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली आहे. तिच्याकडून तब्बल १ कोटी रुपये किमतीचे चरस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई केंद्रीय सीमा शुल्क विभाग आणि महसूल गुप्तचर यंत्रणेच्या संयुक्त पथकाने केली. बँकॉकहून आलेल्या या महिलेने सौंदर्य प्रसाधनांच्या डब्यातून चरस आणल्याची गोपनीय माहिती कस्टम आणि डीआरआयच्या पथकाला…

Read Full News

नाशिक काॅर्पोरेट जिहाद:मुख्य संशयित निदा खानची पतीही सोडणार साथ, नाशिक येथील न्यायालयात मागितला काडीमोड, 16 रोजी सुनावणी

आयटी क्षेत्रातील एका नामंकित कंपनीत कथित धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गंभीर आरोपाखाली तुरुंगात जाऊन सध्या जामिनावर बाहेर असलेली निदा खान ही गरोदर आहे. त्यातच आता तिच्या वैयक्तिक आयुष्यातही मोठा भूकंप आला आहे. पती मोईन खानने तिच्यापासून विभक्त होण्यासाठी नाशिकरोड येथील कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली आहे….

Read Full News

साताऱ्यात बिबट्याचा थरार:घराबाहेर खेळणाऱ्या 2 वर्षांच्या चिमुरड्यावर हल्ला, उपचारापूर्वीच मृत्यू

सातारा तालुक्यातील न्हाळेवाडी परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात अवघ्या 2 वर्षांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. जय संदीप खंडागळे असे मृत बालकाचे नाव आहे. रात्रीच्या सुमारास घराबाहेर खेळत असलेल्या जयला बिबट्याने अचानक उचलून नेले. ग्रामस्थांनी आरडाओरड करत बिबट्याचा पाठलाग केला. लोकांचा गोंधळ वाढल्यानंतर बिबट्याने बालकाला सोडून दिले. मात्र, गंभीर जखमी झालेल्या जयचा मृत्यू झाला. सातारा तालुक्यातील शिवथर…

Read Full News

उल्हासनगरमध्ये महायुतीतील संघर्ष चिघळला:भाजपचा युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय, शिवसेनेचे प्रत्युत्तर

उल्हासनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर आला आहे. नुकत्याच झालेल्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून दोन्ही पक्षांमध्ये निर्माण झालेला वाद अधिकच चिघळला असून, भाजपने पत्रकार परिषद घेत उल्हासनगरमध्ये युतीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. यापुढील कोणत्याही निवडणुकीत खासदार श्रीकांत शिंदे यांना सहकार्य न करता स्वतंत्रपणे काम करण्याची भूमिका भाजपकडून जाहीर करण्यात आली आहे. उल्हासनगरमधील…

Read Full News

OpenAI Safety Expert David Robinson Resigns; Warns AI Risks

नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ChatGPT तयार करणाऱ्या कंपनी OpenAI चे सुरक्षा तज्ज्ञ डेव्हिड रॉबिन्सन यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी इशारा दिला आहे की, मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या नवीन AI तयार करण्याच्या शर्यतीत खूप घाई करत आहेत आणि त्यासोबत असलेल्या मोठ्या धोक्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. रॉबिन्सन यांनी अमेरिकेच्या ‘द अटलांटिक’ मासिकातील एका लेखात लिहिले की, AI…

Read Full News

TMC ने 2 संसदीय समित्यांचे अध्यक्षपद गमावले:डोला यांच्या जागी सुधांशू वाणिज्य समितीचे प्रमुख बनले; दोन्ही सभागृहांत ममता गटाचे केवळ 16 खासदार

नवी दिल्ली येथे शनिवारी संसदीय समित्यांची पुन्हा स्थापना करण्यात आली. वर्षभरापूर्वी स्थापन झालेल्या या समित्यांचा कार्यकाळ संपला होता. त्यामुळे राज्यसभा सभापती सी. पी. राधाकृष्णन आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विभागांशी संबंधित स्थायी समित्यांची पुनर्रचना केली. या बदलानंतर तृणमूल काँग्रेसकडून (TMC) दोन मोठ्या समित्यांचे अध्यक्षपद गेले. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील TMC मध्ये फूट पडल्यानंतर हा…

Read Full News

महायुतीत सत्तेचा वाटा मिळत नसल्याची रामदास आठवलेंची खंत:म्हणाले, ‘शरद पवारांनी 7 विधान परिषद जागा दिल्या, भाजपसोबत 12 वर्षांत एकही नाही’

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाला महायुतीमध्ये अपेक्षित राजकीय वाटा मिळत नसल्याची खंत केंद्रीय राज्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. पक्षाची संघटनात्मक ताकद मोठ्या पक्षांच्या तुलनेत कमी असली, तरी महायुतीतील घटक पक्षांनी रिपब्लिकन पक्षाला सत्तेत योग्य प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. विधान परिषदेची किमान एक जागा रिपब्लिकन पक्षाला मिळावी,…

Read Full News

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवारांचा पुरुषोत्तम जगतापांना इशारा:‘अजितदादांचं नाव वापरायचं आणि कुटुंबाला बदनाम करायचं, हे चालणार नाही’

बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते श्री सोमेश्वर मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी त्यांनी कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आणि बंडखोरी करत स्वतंत्र पॅनल उभे केलेले पुरुषोत्तम जगताप यांच्यावर थेट निशाणा साधला. अजित पवारांचे नाव आणि फोटो वापरून निवडणूक लढवू नये, तर स्वतःच्या कर्तृत्वावर निवडणूक लढवावी, असा…

Read Full News

बंद खोलीतील खुनाचा काही तासांत उलगडा:विष्णुपुरीतील तरुणाचा दगडाने ठेचून खून, पंजाबमधील आरोपी नांदेड ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात

विष्णुपुरी परिसरातील बंद खोलीत तरुणाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या खूनप्रकरणाचा नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावत मुख्य आरोपीला ताब्यात घेतले. बंदूक परत न केल्याच्या वादातून तरुणाचा दगडाने डोक्यात व तोंडावर गंभीर वार करून खून केल्याचे तपासात समोर आले आहे. मयत सनी अजेबिसंग मसीह (वय ३६, रा. ईसानगर, बटाला,…

Read Full News

अमरावती जिल्हा बँकेच्या प्रशासक नियुक्तीचा निकाल:संचालकांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश उद्या, 5 ऑक्टोबरला येणार

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (एडीसीसी) संचालक मंडळाला मुदतवाढ मिळणार की प्रशासक नेमला जाणार, याचा निर्णय उद्या, ५ ऑक्टोबरला होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात या याचिकेवर सुनावणी पूर्ण झाली आहे. बँकेच्या विद्यमान संचालकांचा कार्यकाळ ४ ऑक्टोबरला संपत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमधील वादामुळे वेळेत निवडणूक होऊ शकली नाही. सत्ताधारी संचालकांनी नवीन मंडळ येईपर्यंत मुदतवाढ…

Read Full News