शेतकरी आत्महत्यांवर संजय गायकवाड यांचे वादग्रस्त वक्तव्य:‘मृतदेह जनावरं खातील, तेव्हा कळेल’ म्हणत व्यक्त केला संताप
राज्यात शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न गंभीर बनलेला असताना शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी यासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. शेतकरी आत्महत्या का करतात, असा सवाल करत त्यांनी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंत्यविधीला कोणीही जाऊ नये, असे विधान केले. तसेच, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे मृतदेह जनावरं खातील, तेव्हा त्यांना आपल्या निर्णयाची जाणीव होईल, असेही ते म्हणाले….