मध्य रेल्वे कोलमडली! कांजूरमार्गमध्ये सिग्नल केबिनला आग:5 तासांपासून वाहतूक ठप्प; रविवारी मेगाब्लॉक घेऊनही सोमवारी मोठा बिघाड
कुर्मगती कारभार, रोज उशिराने धावणाऱ्या ट्रेन आणि वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या मध्य रेल्वेच्या गलथानपणाचा सोमवारी पुन्हा एकदा कळस पाहायला मिळाला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळी 10 वाजता मध्य रेल्वेमार्गावरील सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड झाला. दुपारचे दोन वाजले तरी रेल्वे प्रशासनाला हा बिघाड दुरुस्त करता न आल्याने गेल्या पाच तासांपासून मध्य रेल्वेची अप आणि डाऊन…