Headlines

निसर्गाची राखरांगोळी करणारे प्रकल्प महाराष्ट्रात का?:कर्जत वृक्षतोडींवरून सतेज पाटलांचा सवाल, म्हणाले- रोजगार द्या, पण पर्यावरणाचा बळी घेऊ नका

रायगड जिल्ह्यातील कर्जत-भीमाशंकर परिसरातील समृद्ध जंगलावर कुऱ्हाड चालवून उभारल्या जाणाऱ्या गुजरातच्या ‘टॉरेंट पॉवर’ कंपनीच्या जलविद्युत ऊर्जा साठवण (पंप स्टोरेज) प्रकल्पावरून महाराष्ट्रातील राजकीय आणि पर्यावरणीय वातावरण चांगलेच तापले आहे. “एका बाजूला राज्यात एल निनोचा प्रभाव असल्याचे सांगून पाऊस कमी झाल्याचे कारण पुढे करायचे आणि दुसऱ्या बाजूला पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर बसवून हजारो-लाखो झाडे तोडणारे, निसर्ग उद्ध्वस्त…

Read Full News

500 कोटींचं प्रकरण आमच्या दृष्टीने संपलं:फॉरेन्सिक रिपोर्टनंतर सत्य बाहेर येईल- संजय शिरसाट, आदित्य ठाकरेंच्या कर्जत दौऱ्यावरुनही लगावला टोला

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती, ५०० कोटींची ऑडिओ क्लिप, कर्जतमधील वृक्षतोड आणि राजकीय नेत्यांची विधाने अशा विविध मुद्द्यांवर राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. विशेषतः मराठवाड्यात वाढलेल्या सावकारी आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या मनमानी कारभारावर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, अशा ‘गुंड’ सावकारांचे परवाने रद्द करण्याची मागणी…

Read Full News

काँग्रेसचा दावा- अरुणाचलमध्ये चिनी सैनिक 40-50 किमी आत घुसले:लष्कराने घुसखोरीचा व्हायरल व्हिडिओ बनावट असल्याचे सांगितले

अरुणाचल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बोसिराम सिरम यांनी दावा केला आहे की, अप्पर सुबनसिरी जिल्ह्यात चिनी सैनिक भारतीय सीमेच्या ४०-५० किलोमीटर आतपर्यंत घुसले आहेत. त्यांनी सांगितले की, सीमेवर अनेक ठिकाणी भारतीय आणि चिनी सैनिक आमनेसामने आहेत, त्यामुळे सैनिकांची गस्त आणि स्थानिक लोकांची ये-जा प्रभावित होत आहे. स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीचा हवाला देत सिरम यांनी जुलैच्या शेवटच्या…

Read Full News

Aamir Khan Was Target of Shooters in Mumbai

11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या हल्ल्याची चौकशी करणाऱ्या पोलिसांना मोठा धागा मिळाला आहे. द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, पोलिस सूत्रांनी खुलासा केला आहे की, २० सप्टेंबर रोजी हरियाणातून मुंबईत आलेल्या शूटर्सचे खरे लक्ष्य आमिर खान होते. लॉरेन्स गँगच्या इशाऱ्यावर मुंबईत पोहोचलेल्या शूटर्सनी आमिर खानच्या घराची तीन वेळा रेकी केली होती; मात्र…

Read Full News

BJP Slams Sanjay Raut Over AI Video Controversy

“राज्यात सध्या गाजत असलेली कथित 500 कोटी रुपयांची ऑडिओ क्लिप ही पूर्णपणे बनावट असून ‘सामना’च्या कार्यालयात बसून पारावरच्या गप्पांच्या स्क्रिप्टवरून तयार करण्यात आली आहे. संजय राऊत यांनीच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) माध्यमातून ही क्लिप तयार केली आ . भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नवनाथ बन यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या…

Read Full News

शिंदे-फडणवीसांचा राजकीय 'गेम' करण्याचा कट:ऑडिओ क्लिपची ED चौकशी व्हावी, मराठा समाजासाठी लढल्यामुळे सरकारने खूप त्रास दिला- जरांगे पाटील

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात या ऑडिओ क्लिपप्रकरणी मोठी खदखद आहे. फडणवीस यांना अंधारात ठेवून काही लोकांनी हे सर्व कारस्थान रचले होते. या षड्यंत्रातून शिंदे आणि फडणवीस दोघांचाही राजकीय गेम करायचा होता; मात्र ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे कट रचणाऱ्यांचाच गेम झाला आहे, असा दावा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. या…

Read Full News

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू:पुण्यातील लोणीकंद परिसरात अपघात, चालकावर गुन्हा दाखल

पुण्यातील लोणीकंद परिसरात एका भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद रोहिदास झोडगे (वय २९, रा. अभंगनगर, देहूगाव, पुणे, मूळ रा. कारंडी, बीड) असे मृत तरुणाचे नाव आहे. प्रमोद यांचे भाऊ अण्णासाहेब (वय ३४) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Read Full News

आपल्याकडे खेड्यातील न्हावीही प्लास्टिक सर्जरी करायचे!:स्वतःच्या मुली विकणाऱ्या ब्रिटिशांनी भारतीयांना समतेचे शहाणपण शिकवू नये; भालचंद्र नेमाडेंचे प्रतिपादन

“भारताला हजारो वर्षांची अत्यंत समृद्ध आणि प्रगत ज्ञानपरंपरा लाभलेली आहे. प्राचीन भारतात अगदी खेड्यापाड्यातील न्हावीदेखील ओठ आणि दात नीट करण्यासारखी गुंतागुंतीची प्लास्टिक सर्जरी करायचे आणि हे पाहून इंग्रजांना आश्चर्य वाटायचे. आपल्याकडे इसवी सन पूर्व पहिल्या शतकात म्हणजेच सुमारे 2,127 वर्षांपूर्वी खेड्यातील महिला कविता लिहीत होत्या. ज्या ब्रिटिशांच्या समाजात जेन ऑस्टिनच्या आधी एकही लेखिका नव्हती आणि…

Read Full News

राहुल गांधींच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांवर आदळल्या:यूपीमध्ये पूर्वांचल एक्सप्रेस-वेवर अपघात, सुलतानपूर न्यायालयात हजर राहण्यासाठी जात होते

राहुल गांधी यांच्या ताफ्यातील गाड्या सोमवारी सकाळी सुलतानपूरमध्ये पूर्वांचल एक्सप्रेस-वेवर एकमेकांवर आदळल्या. हा अपघात अतिवेगामुळे झाल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये काही जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. राहुल गांधी सुरक्षित आहेत. राहुल सुलतानपूर न्यायालयात पोहोचणार आहेत. अमित शहा यांच्याशी संबंधित मानहानीच्या प्रकरणात ते एमपी-एमएलए न्यायालयात हजर राहतील. न्यायालय आज या प्रकरणात निकाल सुनावू शकते. न्यायालयाने राहुल…

Read Full News

लोकशाही वाचवण्यासाठी देशात दुसरा स्वातंत्र्य संग्राम लढावा लागेल:खासगी कंपनीच्या हाती मतदार याद्या देऊन 3 कोटी मतांवर दरोडा -हर्षवर्धन सपकाळ

“देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाचा खरा मालक सर्वसामान्य नागरिक ठरला होता. मात्र, आज देशात जनतेचे राज्य नसून निवडणूक आयोग आणि केंद्र सरकार निवडक उद्योगपतींसाठी व्यवस्था चालवत असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मतांमध्ये खुलेआम चोरी होत असून लोकशाहीचा मूळ गाभाच धोक्यात आला आहे. त्यामुळे केवळ निषेध नोंदवून चालणार नाही, तर भारताची लोकशाही आणि संविधानाने दिलेला मताधिकार…

Read Full News