Headlines

सेन्सेक्समध्ये 200 अंकांची घसरण, 72,900 वर व्यवहार:निफ्टीही 100 अंकांनी खाली; ऑटो आणि IT शेअर्समध्ये अधिक विक्री

शेअर बाजारात आज म्हणजेच 26 ऑक्टोबर रोजी घसरण आहे. सेन्सेक्स 200 अंकांच्या घसरणीसह 72,900च्या पातळीवर व्यवहार करत आहे. त्याचवेळी निफ्टीमध्येही 100 अंकांची घसरण झाली आहे आणि तो 22,500च्या पातळीवर व्यवहार करत आहे. ऑटो, IT आणि सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये अधिक विक्री दिसून येत आहे. आशियाई बाजारांमध्ये संमिश्र व्यवहार अमेरिकन बाजारात 23 ऑक्टोबरला घसरण झाली परदेशी गुंतवणूकदारांनी…

Read Full News

माळीवाड्यात एफडीएचा छापा:दिवाळीच्या फराळात भेसळीचा संशय; 443 किलो साठा जप्त, गोडीशेव, वाटाण्याचा 1.81 लाखांचा मुद्देमाल जप्त

दिवाळीच्या सणासुदीत नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील माळीवाडा भागातील पंचपीर चावडी येथील एका दुकानावर छापा टाकून ४४३ किलो संशयित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. यात मिरची पावडर, हळद पावडर, गोडीशेव आणि हिरव्या वाटाण्याचा समावेश असून, जप्त मुद्देमालाची किंमत १ लाख ८१ हजार ६०० रुपये आहे. पदार्थांमध्ये…

Read Full News

चमत्कारांचा मुखवटा उतरला; विज्ञानाचे सत्य उलगडले:देवगाव येथील श्रीराम विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन

शालेय वयापासूनच विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची ओढ निर्माण होणे गरजेचे आहे. प्रत्येक घटनेमागे कार्यकारणभाव असतो. त्यामुळे कोणत्याही घटनेकडे डोळसपणे पाहून तिच्यामागील वैज्ञानिक सत्य जाणून घ्यावे, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा प्रधान सचिव विनायक सापा यांनी केले. देवगाव येथील श्रीराम विद्यालयात अहिल्यानगर अंनिस शाखेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी चमत्कार, भूतबाधा आणि श्रद्धेचा गैरवापर या विषयांवर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन सत्र घेण्यात…

Read Full News

कुंभमेळ्यापूर्वी नाशिकमध्ये शंखनादाचा विश्वविक्रम:517 जणांचा सहभाग, 303 जणांचा जुना विक्रम मोडला, 31 ऑक्टोबरपासून मेळ्याला सुरुवात

नाशिकमध्ये रविवारी ५१७ भाविकांनी एकाच वेळी शंख वाजवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. हा कार्यक्रम गोदावरी नदीच्या काठावर झाला. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यापूर्वी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सहभागींनी पाच मिनिटे ३० सेकंद शंख वाजवले. आयोजकांच्या म्हणण्यानुसार, या कार्यक्रमासाठी चेन्नईहून खास प्रमाणित शंख मागवण्यात आले होते. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे वरिष्ठ परीक्षक ऋषी नाथ यांनी देवमामलेदार…

Read Full News

डाव्यांचे आक्रमण; परतवून लावा:‘रास्वसंघा’चे कार्यकारिणी सदस्य श्यामजी हरकरे यांचे प्रतिपादन

देशात सध्या डाव्या (वामपंथी) विचारांच्या आक्रमणाचे नवे संकट घोंघावत आहे. त्यांना या देशाचा उत्कर्ष हवा नसून देश अपकर्षाच्या खाईत लोटण्याचे त्यांचे ध्येय आहे. त्यांना भारताला विश्वगुरु होऊ द्यायचे नाही. त्यामुळे देश, हिंदुत्व आणि धर्म-संस्कृती या त्रयीवर चालणारा आपला संघ विचार अधिक मजबूत व समाजाभिमुख करा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम क्षेत्रीय कार्यकारिणीचे सदस्य आणि…

Read Full News

कोजागिरीनिमित्त जिल्ह्यात 1 लाख लिटर अतिरिक्त दुधाची विक्री:गेल्या वर्षीच्या तुलनेत 2.5 लाख लिटरने मागणी घटली : जिल्ह्याला दररोज लागते 1.5 लाख लिटर दूध

अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) दणक्यामुळे कोजागिरीला जिल्ह्यात लागणाऱ्या दुधाची मागणी आश्चर्यकारकरित्या २.५ लाख लिटरने कमी झाल्याची माहिती खुद्द अमरावती जिल्हा डेअरी असोसिएशनने दिली. २०२५ च्या कोजागिरी पौर्णिमेला जिल्ह्यात ५ लाख लिटर दुधाची खरेदी झाली होती. यंदा केवळ १ लाख लिटर अतिरिक्त दुधाची खरेदी झाली. जिल्ह्यात दररोज १.५ लाख लिटर दूध लागते. त्याव्यतिरिक्त रविवार २५…

Read Full News

पोलिओ निर्मूलनाचा संदेश; विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली:ओंकारनगर शाळेत चित्रकला स्पर्धा; विजेत्यांना बक्षिसे

जागतिक पोलिओ निर्मूलन दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर मिडटाऊनच्या वतीने ओंकारनगर, केडगाव येथील मनपा प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली. यानिमित्त चित्रकला स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांसाठी तीन गटांत घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना रोटरी क्लबच्या वतीने बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊवाटपही करण्यात…

Read Full News

We will force the decision to cut power on Ashti to be changed

Marathi News Local Maharashtra Solapur We Will Force The Decision To Cut Power On Ashti To Be Changed Kha. Shinde, Provide Electricity To Agricultural Farms For Four Hours A Day, Otherwise Block The Road पापरी18 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पापरी आष्टी प्रकल्पांतर्गत शेतीपंपांसाठी दिवसातून केवळ दोन तास वीजपुरवठा करण्याच्या निर्णयामुळे शेतकरी आणि पशुपालक अडचणीत सापडले आहेत….

Read Full News

दलेर मेहंदीचा अपमान करणाऱ्या मंत्र्याने मागितली माफी:फोनवर संवाद; परफॉर्मन्स थांबवत म्हणाले होते- तुम्ही दारू पिऊन गाणे गात आहात

उत्तराखंडमध्ये गायक दलेर मेहंदी यांच्या सादरीकरणावेळी झालेल्या वादाप्रकरणी कॅबिनेट मंत्री सुबोध उनियाल यांनी माफी मागितली आहे. सुबोध उनियाल यांनी दलेर मेहंदी यांच्याशी फोनवरून संवाद साधत या घटनेबद्दल खेद व्यक्त केला. मंत्र्यांनी मागितलेल्या माफीचे गायक मीका सिंग यांच्या टीमने स्वागत केले आहे. मीकाच्या टीमकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात कलाकारांचा सन्मान आणि प्रतिष्ठा जपणे आवश्यक असल्याचे म्हटले…

Read Full News

Sanjay Raut Writes To Amit Shah Seeking PMLA Probe In 500 Crore Case

मनोज जरांगे पाटील यांनी उघड केलेल्या ५०० कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाने राज्यातील राजकारण ढवळून निघाले असतानाच, आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दोन पानांचे सविस्तर पत्र . ‘भाजपकडून आता आंदोलनेही विकत घेण्याचा प्रयत्न’ संजय राऊत यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये भाजपवर अत्यंत गंभीर…

Read Full News