Headlines

Bachchu Kadu Demands Finance Portfolio For NCP Amid Microfinance Controversy

सरकारने जी 5 हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना जाहीर केली आहे त्यामध्ये वाढ झाली पाहिजे आणि 30 तारखेपूर्वी ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली तर बरे होईल, असे शिवसेना नेते बच्चू कडू यांनी म्हटले आहे. तर मनोज जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिप संदर्भात को . बच्चू कडू म्हणाले की, महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेनेत काहीही तणाव नाही….

Read Full News

रामायणचे गाणे मंगल रंग वादात:कव्वालीसारखी धून आणि हळदीसारख्या विधीच्या दृश्यावर टीका; राम-सीतेच्या विवाहावर आधारित गाणे

रणबीर कपूर आणि साई पल्लवी अभिनीत ‘रामायण’ चित्रपटातील नवीन गाणे ‘मंगल रंग’ रविवारी प्रदर्शित करण्यात आले. ए.आर. रहमान यांच्या संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला अरिजित सिंग आणि श्रेया घोषाल यांनी आवाज दिला आहे. गाणे प्रदर्शित होताच सोशल मीडियावर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. गाण्यात कव्वाली आणि सूफी बीट्सचा वापर केल्याबद्दल लोकांनी संगीतकार ए.आर. रहमान यांच्यावर टीका केली…

Read Full News

मुख्यमंत्र्यांना सह्याद्रीचं वाळवंट करायचंय का?:कर्जतमधील वृक्षतोडीवरून सयाजी शिंदेंचा सरकारला सवाल, म्हणाले- जनतेने आता पेटून उठावे

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका आणि भीमाशंकर अभयारण्य परिसरात ‘टोरेंट पॉवर’ कंपनीच्या प्रकल्पासाठी होत असलेल्या वृक्षतोडीवरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय नेत्यांनंतर आता पर्यावरणप्रेमी आणि अभिनेत्यांनी या जंगलतोडीविरोधात तीव्र रोष व्यक्त केला आहे. ‘सह्याद्री देवराई’च्या माध्यमातून राज्यभरात वृक्षारोपणाची मोठी चळवळ उभी करणारे ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी या वृक्षतोडीवरून सरकारवर सडकून टीका केली आहे. “छत्रपती…

Read Full News

बारामतीत लाचखोर वनपालाला अटक:शेतकऱ्याकडून 6 हजार रुपये स्वीकारताना एसीबीने पकडले

शेतात मातीचा भराव टाकण्याचे काम सुरू ठेवण्यासाठी सहा हजार रुपये स्वीकारणाऱ्या वनपालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. या प्रकरणी वनपाल जहीर सिराज शेख (वय ४७) याला अटक करण्यात आली. तो बारामती वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत करंजे येथे नियुक्तीस आहे. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे. तक्रारदाराची कोऱ्हाळे खुर्द येथे चार हेक्टर शेतजमीन आहे. पावसामुळे…

Read Full News

सारा अली खानने बाबा केदारनाथांचे दर्शन घेतले:बर्फवृष्टीदरम्यान कुडकुडताना दिसल्या; मंदिर अधिकाऱ्यांपासून राखले अंतर

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान यांनी गुपचूप उशिरा संध्याकाळी केदारनाथचे दर्शन घेतले. त्या हेलिकॉप्टरने धामवर पोहोचल्या. त्यांच्या आगमनानंतर धाममध्ये बर्फवृष्टीही झाली. थंडीमुळे सारा लोकांमध्ये कुडकुडताना दिसल्या. यावेळी साराने मंदिरातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांपासून अंतर राखले. सारा सुमारे अर्धा तास रांगेत उभी होती. या काळात, तिथे उपस्थित असलेल्या लोकांना तिला ओळखता आले नाही. जेव्हा तिथे उभ्या असलेल्या…

Read Full News

जामियामध्ये 20 वर्षांनंतर विद्यार्थी संघाच्या निवडणुकीची घोषणा:विद्यापीठ प्रशासन म्हणाले- संविधान मंजूर झाल्यानंतर 15 दिवसांनी मतदान

दिल्लीतील जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठात सुमारे २० वर्षांनंतर विद्यार्थी संघाच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे। विद्यापीठ प्रशासनाने सोमवारी आदेश जारी करून सांगितले की, विद्यार्थी संघाच्या संविधानाला मंजुरी मिळाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांनी निवडणुका घेण्यात येतील. प्रशासनाने आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना बजावण्यात आलेले निलंबन आदेश आणि कारणे दाखवा नोटिसा रद्द करण्याचा निर्णयही घेतला आहे। तसेच, आंदोलनादरम्यान सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची…

Read Full News

नांदेडमधील शेतकरी आत्महत्या चीड आणणारी:अवैध वसुली करणाऱ्या मायक्रो फायनान्सवर कठोर कारवाई करू- गृहराज्यमंत्री पंकज भोयर

नांदेडमधील शेतकऱ्यांची आत्महत्या ही चीड येणारी आहे, त्यामुळे निश्चितच दुषकाळ आणि अडचणीच्या काळात शेतकऱ्यांकडून अव्वाच्या सव्वा व्याजदर आकारत जर वसुली करण्यात येत असेल तर त्यांच्याचर कारवाई करण्यात येईल, असे पंकज भोयर यांनी म्हटले आहे. तर कायद्यामध्ये बदल करत अजून कडक कायद्या या बाबतीमध्ये केला जाईल. पंकज भोयर म्हणाले की, राज्यात अर्थखाते कोणाला द्यायचे याचा निर्णय…

Read Full News

खरगे यांच्या वक्तव्याविरोधात भाजपचे देशभरात आंदोलन:काँग्रेस अध्यक्षांनी पाटण्यात म्हटले होते- मोदींचे वडीलही जातील; तक्रार दाखल

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या ‘मोदी काय, मोदींचे वडीलही जातील’ या वक्तव्यावरून भाजपने सोमवारी देशभरात निदर्शने करण्याची घोषणा केली आहे. त्याचवेळी, काँग्रेसचे अनेक नेते या प्रकरणी स्पष्टीकरण देत खरगे यांचा बचाव करत आहेत. खरगे यांनी रविवारी पाटणा येथे काँग्रेसच्या कार्यक्रमात हे वक्तव्य केले होते. कार्यक्रमादरम्यान एका व्यक्तीने पंतप्रधान कुठेही जाणार नाहीत, असे म्हटले होते. त्याला…

Read Full News

पर्याय असेल तर जंगल वाचवलंच पाहिजे, आवश्यक नसताना वृक्षतोड नकोच:सुधीर मुनगंटीवारांनी भूमिका, म्हणाले- संवादातून मार्ग काढला पाहिजे

भीमाशंकरच्या जंगलात वृक्षतोडीवरून राज्यात वाद पेटला असताना भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आवश्यक नसताना कोणतीही वृक्षतोड करू नये हीच वनविभागाची आणि केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाची भूमिका असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुनगंटीवार नेमके काय म्हणाले? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, सरकारची अधिकृत माहिती जर वृक्षतोडीच्या संदर्भात वृक्ष तोडण्याबाबत नसेल,…

Read Full News

टोरेंट कंपनी काय तुमची जावई आहे का?:भीमाशंकरमधील वृक्षतोडीवरून संदीप देशपांडे संतापले, म्हणाले – झाडं कापून कुठला ग्रीन प्रोजेक्ट होतो?

कर्जत तालुक्यातील खांडस आणि भीमाशंकर अभयारण्यालगतच्या जंगलात ‘टोरेंट’ या गुजरातच्या कंपनीकडून सुरू असलेल्या वृक्षतोडीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र विरोध दर्शवला आहे. या प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता स्वतः मैदानात उतरले असून, ते २८ ऑक्टोबर रोजी सकाळी या वृक्षतोडीची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी कर्जत येथील पोलीस ग्राउंड मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार असून,…

Read Full News