कॉरडेलिया स्काय क्रूझ दाखल; देशातील पर्यटनाला नवी झेप:जुर्गेन बेलोम यांचे 2032 पर्यंत भारताला टॉप 5 क्रूझ बाजारपेठांत नेण्याचे लक्ष्य
विमान प्रवासाची सवय असलेल्या भारतीय पर्यटकांना आता समुद्रमार्गे सुट्टी घालवण्याचा नवा पर्याय उपलब्ध होत आहे. कॉरडेलिया क्रूझचे ‘कॉरडेलिया स्काय’ मुंबईतून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्याने देशांतर्गत क्रूझ पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. कंपनीने २०३२ पर्यंत भारताला जगातील पहिल्या पाच क्रूझ पर्यटन बाजारपेठांमध्ये स्थान मिळवून देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, त्यासाठी केवळ जहाजांची संख्या वाढवून चालणार नाही;…