परीक्षेतील भ्रष्टाचारविरोधात एल्गार; विद्यार्थ्यांचे आंदोलन:आंदोलनावरील कारवाईचा निषेध; पावसातही एकवटली तरुणाई
एमपीएससी, यूपीएससी, नीट, एसएससी, शिक्षक भरतीसह विविध स्पर्धा परीक्षा व भरती प्रक्रियेत सातत्याने होत असलेल्या गैरव्यवहार, भ्रष्टाचारविरोधात बुधवारी तरुणाईने एल्गार पुकारला. विद्यार्थी- विद्यार्थिनींनी भरपावसातच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटत नीट पेपर फुटीबाबत कठोर कारवाईसह केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्याची मागणी लावून धरली. दिल्ली येथे आंदोलक विद्यार्थी- विद्यार्थिनीवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध नोंदवत स्वतंत्र चौकशीचा आग्रह…