Headlines

विद्यार्थ्यांच्या भूतबाधेचे भय घालवण्यासाठी कलेक्टर, एसपींचा आश्रमशाळेत मुक्काम:आदिवासींचा लढवय्या इतिहास सांगितला; सीईओ, प्रकल्प अधिकारीही सोबत होते

अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील डोमा येथील आदिवासी आश्रमशाळेत जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी मंगळवारी मुक्काम केला. भूतबाधेच्या भीतीने काही विद्यार्थ्यांनी शाळा सोडून घरी जाणे पसंत केले होते. ही भीती दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक निकेतन कदम, जिल्हा परिषदेचे सीईओ सत्यम गांधी आणि मेळघाटचे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांच्यासह इतर अधिकारीही उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थी…

Read More

शिक्षा:65 वर्षांच्या वृद्धाला तीन वर्षांचा सश्रम कारावास चिमुकलीवर केला होता लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

सहा वर्षांच्या अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ६५ वर्षीय वृद्धाला येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवून तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. आरोपीला ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक दिवस साधा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. आज, बुधवार २ सप्टेंबर रोजी या प्रकरणाचा अंतिम निर्णय जाहीर झाला. किशोर…

Read More

नांदेड जिल्ह्यात पोलिसांचे ‘कॉम्बिंग ऑपरेशन’:93 सराईत गुन्हेगारांची तपासणी; 122 मपोका अन्वये दोन गुन्हे दाखल, 57 समन्स व 37 वॉरंट बजावले

नांदेड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नांदेड पोलिसांनी विशेष ‘कॉम्बिंग ऑपरेशन’ राबवून सराईत गुन्हेगार, तडीपार व्यक्ती, पाहिजे व फरारी आरोपी तसेच संशयित व्यक्तींची सखोल तपासणी केली. या कारवाईत ९३ सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली असून, पाहिजे व फरारी असलेल्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार १…

Read More

जरांगे पाटलांच्या भाषेवर विनोद पाटलांची उघड नाराजी:म्हणाले- भाषा चुकीची असेल तर ती चुकीचीच, महिलांचा सन्मान राखलाच पाहिजे

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले असून आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. यावर मराठा आरक्षण अभ्यासक विनोद पाटील यांनी प्रतिक्रिया देताना जरांगे यांच्या भाषेबाबत नाराजी व्यक्त केली आणि म्हटले की, “छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आमच्यावर आहे, त्यामुळे महिलांचा सन्मान झाला पाहिजे. कल्याणच्या सुभेदाराची सून परत करणारी अवलाद आमची आहे. भाषा…

Read More

नांदेडमध्ये स्पाच्या नावाखाली देहव्यापार:सात महिलांची सुटका; तिघांना अटक, मालक फरार

शिवाजीनगर पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या महात्मा फुले मार्केटमधील वेलनेस स्पा सेंटरवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मंगळवारी रात्री धाड टाकली. स्पा सेंटरच्या नावाखाली देहव्यापार सुरू असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी सात महिलांची सुटका केली. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली असून स्पा सेंटरचा मालक फरार झाला आहे. महात्मा फुले मार्केटमधील वेलनेस स्पा सेंटरमध्ये देहव्यापार सुरू…

Read More

नैरोबीच्या महिलेला पुण्यात डॉक्टरांनी वाचवले प्राण:17व्या वर्षी 200 किलो वजन, 11 शस्त्रक्रिया आणि सेप्सिसशी झुंजल्यानंतर मिळाला ‘पुनर्जन्म’

गेल्या १५ वर्षांत तब्बल ११ शस्त्रक्रियांना सामोरे गेलेल्या नैरोबीतील एका ३२ वर्षीय महिलेचे प्राण पुण्यातील डॉक्टरांनी वाचवले. पोटातील गंभीर संसर्ग, शस्त्रक्रियेनंतर झालेला लीक, सेप्सिस आणि पोषणतत्त्वांची तीव्र कमतरता अशा गंभीर परिस्थितीत तिच्या जगण्याची शक्यता केवळ २० टक्के असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र, लॅपरो ओबेसो सेंटर (एलओसी), पुणे येथील बॅरिअॅट्रिक व लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. शशांक शाह…

Read More

Pune Entrepreneur Grievance Cell Launched; Monthly Meeting Scheduled

पुणे जिल्ह्यात उद्योजकांच्या शासकीय आणि प्रशासकीय समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योग तक्रार निवारण कक्ष आणि मैत्री सेल सुरू करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली या उपक्रमाची पहिली बैठक झाली. या बैठकीत विवि . या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह उद्योग, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, कामगार, ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क, वैधमापन शास्त्र, महाराष्ट्र…

Read More

पत्नीचा खून, पोटच्या मुलावर चाकूने हल्ला:फरार माजी सैनिकाचा अखेर भीमा नदीकाठी मृतदेह आढळला

पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर परिसरात घडलेल्या एका कौटुंबिक हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरला आहे. पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर स्वतःच्या 17 वर्षीय मुलावरही जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप असलेला माजी सैनिक महेंद्र शिवाजी दौंडकर याचा मृतदेह बुधवारी सकाळी भीमा नदीकाठी आढळून आला. आरोपीने नदीकाठच्या एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. बहिणीशी पत्नी बोलत…

Read More

‘त्यांना व्हिक्टिम कार्ड खेळायचे असेल तर त्या स्वतंत्र':पत्नी अपरा मेहता यांना कुरूप म्हटल्याच्या आरोपावर दर्शन जरीवाला यांनी दिले स्पष्टीकरण

ज्येष्ठ अभिनेते दर्शन जरीवाला यांनी वेगळ्या राहत असलेल्या पत्नी आणि अभिनेत्री अपरा मेहता यांनी त्यांना कुरूप म्हटले असल्याच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले. खरं तर, काही काळापूर्वी अपरा मेहता यांनी दर्शन जरीवाला यांच्यापासून वेगळे होण्याबद्दल (सेपरेशन) बोलले होते. हॉटरफ्लाईला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, दर्शन घर सोडून निघून गेले होते आणि त्यांना आजवरची सर्वात कुरूप महिला…

Read More

मुंबईसह तीन विद्यापीठांत आता ‘कुलपती पदक’:राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते मुंबई, पुणे, नागपूर विद्यापीठांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचा धनादेश

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्रातील मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आता ‘कुलपती पदक’ प्रदान करण्यात येणार आहे. राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात येत असलेल्या या उपक्रमासाठी राज्यपालांच्या हस्ते तिन्ही विद्यापीठांच्या कुलगुरूंना प्रत्येकी १० लाख रुपयांचा प्रातिनिधिक धनादेश बुधवारी लोकभवन, मुंबई…

Read More