Headlines

अशोक खरात प्रकरणात 4 मंत्र्यांचा थेट सहभाग:माहिती मिळाल्यावर खरातला मारून टाकतील, कॉंग्रेस नेते नाना पटोलेंचा खळबळजनक दावा

नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्यातील चार मंत्र्यांचा या प्रकरणात थेट सहभाग असल्याचा खळबळजनक दावा करत प्रकरणाला नवे वळण दिले आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी खरातला आधीच अटक करण्यात आली असून, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. या प्रकरणातील काही आक्षेपार्ह व्हिडिओ समोर…

Read More

भोंदू खरात प्रकरण:रुपाली चाकणकरांना वाचवण्यासाठी सुनील तटकरेंचे प्रयत्न, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा

भोंदू खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांना वाचवण्याचा मोठा प्रयत्न झाला. खासदार सुनील तटकरे यांनी चौकशी होऊ नये म्हणून आटोकात प्रयत्न केले ते ढाल म्हणून त्यांच्या समोर उभे होते, पण मी डीजींना पत्र पाठवले होते की सर्वांची चौकशी झालीच पाहिजे, त्यामुळेच रुपाली चाकणकर यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. अंजली…

Read More

विहीर खचल्याने वडिलांसह 2 मुले गाडली गेली:संभाजीनगरच्या धानोऱ्यातील मन सुन्न करणारी घटना; मोटार पंप बसवताना दुर्घटना

शेतातील विहिरीतून मोटारपंप बसवताना अचानक विहीर खचून झालेल्या दुर्घटनेत वडिलांसह 2 मुलांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात घडली आहे. एका क्षणात कुटुंबातील 3 कर्ते पुरुष गेल्यामुळे पीडित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, सिल्लोडच्या धानोरा गावात शनिवारी रात्री ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे. बाजीराव सर्जेराव काकडे, आजिनाथ बाजीराव काकडे…

Read More

विकास लवांडेंवरील हल्लेखोरांवर कारवाई करा:शरद पवारांचा पोलिस महासंचालकांसह पुणे पोलिस आयुक्तांना फोन; मुख्यमंत्र्यांनाही भेटणार

वारकरी संप्रदायातील कथित घुसखोरांविरोधात रान छेडल्यामुळे शाईफेक हल्ल्याला सामोरे गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी आज पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी पवारांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांसह पुणे पोलिस आयुक्तांशी फोनवरून संवाद साधून आरोपींवर कारवाई करण्याची केली. तसेच लवांडे यांना कायमस्वरूपी पोलिस संरक्षण देण्याचीही मागणी केली. शरद पवार हा मुद्दा मुख्यमंत्र्यांसोबत…

Read More

धर्मांतर विरोधी कायदा कडक:चौकशीनंतरच एमआयएम पदाधिकाऱ्यांवर कारवाई- दीपक केसरकर

धर्मांतराचे प्रकार रोखण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, धर्मांतर विरोधी कायदा आता अत्यंत कडक करण्यात आला आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, राज्यात बेकायदेशीर धर्मांतराच्या घटनांना थारा दिला जाणार नाही. एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांवर झालेल्या कारवाईबाबत बोलताना केसरकर म्हणाले की, ही कारवाई पूर्वग्रहातून झालेली नसून सखोल…

Read More

आतिफ अस्लमला कॉन्सर्ट थांबवावा लागला:महिला चाहती सेल्फी घेण्यासाठी स्टेजवर चढली; जाण्यास नकार दिला, सुरक्षा रक्षकांचा हस्तक्षेप

पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नुकताच तो कराचीतील डीएचए स्पोर्ट्स क्लब (मोईन खान अकादमी) मध्ये परफॉर्म करण्यासाठी पोहोचला होता. कॉन्सर्ट दरम्यान एक चाहती त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी स्टेजवर चढली. जो व्हिडिओ समोर आला आहे, त्यात दिसत आहे की चाहतीने आधी आतिफ अस्लमसोबत सेल्फी घेतली. यानंतर आतिफ मागे सरकला. त्यांना वाटले…

Read More

एल्विश यादवला ₹10 कोटींची खंडणी मागितली:दावा- लॉरेन्स गँगची 2 दिवसांत गोळी मारण्याची धमकी; गुरुग्राममधील घरावर 24 गोळ्या झाडल्या होत्या

यूट्यूबर एलविश यादवकडून लॉरेन्स गँगने 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. परदेशी नंबरवरून त्यांना धमकीचा मेसेज पाठवण्यात आला. एलविश सध्या ‘लाफ्टर सेफ’ नावाचा शो करत आहेत. शोच्या शूटिंगमुळे एलविश सध्या गुरुग्रामबाहेर आहेत. कुटुंबातील सदस्यांचे म्हणणे आहे की, आरोपीने धमकी दिली आहे की, ‘2 दिवसांत पैसे दिले नाहीत तर गोळ्या घालू’. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सेक्टर…

Read More

नाशिकमध्ये मध्यस्थी करणे जीवावर बेतले:सलून व्यावसायिकाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या, आरोपी लिफ्ट घेऊन फरार

नाशिकमधील पंचवटी परिसरातील आडगाव नाका येथे शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास एका सराईत मद्यपी गुन्हेगाराने किरकोळ वादातून सलून व्यावसायिक जयवंत यशवंत पवार (45) यांची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली. मधुर मिलन स्वीट्ससमोर घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण नाशिक शहरात खळबळ उडाली असून, पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. जुन्या नाशिकमधील…

Read More

44 पैकी 41पोलिस चौक्या बंद; तीनच्या भरवशावर छत्रपती संभाजीनगरची सुरक्षा:‘दिव्य मराठी’च्या पाहणीत वास्तव उघड; अधिकारी म्हणतात, इतर बंदोबस्तात कर्मचारी

छत्रपती संभाजीनगरात गुन्हेगारीचा आलेख दिवसागणिक वर जात आहे. चोऱ्या, लूटमार आणि गोळीबाराच्या घटना घडत आहेत. एकीकडे पोलिस प्रशासन गस्त सुरू असल्याच्या वल्गना करत असताना, ‘दिव्य मराठी’ने केलेल्या ग्राउंड रिपोर्टमध्ये भलतेच वास्तव समोर आले. नागरिकांच्या तातडीच्या सुरक्षेसाठी उभारलेल्या शहरातील 44 पैकी तब्बल 41 पोलिस चौक्या चक्क कुलूपबंद असल्याचे दिसून आले. “साहेब, या बंद चौक्यांच्या दारावर डोके…

Read More

ओरी म्हणाला- 24 तास कंगना रनोटसोबत राहू शकतो:खतरों के खिलाडी १५ मध्ये दिसणार, म्हणाला- प्रेरणा नाही, फक्त कृतीवर विश्वास ठेवतो

सोशल मीडिया सेन्सेशन ओरहान अवात्रामणि उर्फ ओरी आता स्टंट-आधारित रिॲलिटी शो ‘खतरों के खिलाडी १५’ मध्ये दिसणार आहे. आपल्या अनोख्या शैलीमुळे, मजेदार उत्तरांमुळे आणि व्हायरल व्यक्तिमत्त्वामुळे प्रसिद्ध असलेल्या ओरीने दैनिक भास्करशी खास बातचीत करताना शो, भीती, प्रेरणा, सोशल मीडियावरील प्रतिमा आणि स्वतःच्या वैयक्तिक विचारांबद्दल मनमोकळेपणाने बोलले. या संवादादरम्यान ओरीने सांगितले की त्याला पाणी किंवा धोकादायक…

Read More