पंढरपुरात VIP दर्शनावरून राजकीय वाद:मुनगंटीवारांची खंत, गुलाबराव पाटलांची कबुली, नियम अधिक कडक करण्याचा प्रशासनाचा इशारा
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य वारकऱ्यांना सुलभ दर्शन मिळावे म्हणून विठ्ठल मंदिरात 15 जुलैपासून व्हीआयपी दर्शनावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र या निर्णयाच्या पहिल्याच दिवशी मंदिरात आजी-माजी मंत्र्यांना वेगवेगळी वागणूक मिळाल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कुटुंबीयांना दर्शन नाकारण्यात आले, तर दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील…