अल्प दरात शिलाई मशीन; एक महिन्याचे प्रशिक्षण:स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे आवाहन; तंत्रशुद्ध मार्गदर्शन
शहरातील जुने शहर परिसरात ‘वैष्णवी शिवण क्लास’ च्या वतीने स्थानिक महिलांसाठी अल्प दरात शिलाई मशीन वाटप आणि एक महिन्याच्या विशेष प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने शीतल गिरी यांनी या उपयुक्त उपक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला जुने शहर परिसरातील शेकडो महिलांनी उपस्थित राहून अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सुरुवात…