15 किलोमीटर लांब वारकऱ्यांची रांग; 60 हजारांहून अधिक वैष्णवांचा मेळा:पिंपळगाव माळवी ते अहिल्यानगर शहरापर्यंत पर्यंत भक्तिमय वातावरण
मार्केट यार्डच्या प्रवेशद्वारातून आत पाऊल टाकताच क्षणभर आपण अहिल्यानगरात नसून थेट पंढरपुरात पोहोचलो आहोत, असा भास होत होता. चहुबाजूंनी फडकणाऱ्या भगव्या पताका, ज्ञानोबा-तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठलाच्या अखंड गजरात मार्गक्रमण करणारे हजारो वारकरी, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, गळ्यात टाळ आणि चेहऱ्यावर भक्तिभाव… संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीच्या आगमनाने शनिवारी सायंकाळी मार्केट यार्ड परिसर अक्षरशः मिनी पंढरपूर…