वीटभट्टी मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर:मेळघाटमधील विद्यार्थ्यांचे प्रशासनाला साकडे, आंदोलनाचा इशारा
अमरावती येथील वीटभट्ट्यांवर कामासाठी येणाऱ्या मेळघाटातील मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. ‘खोज’ संस्थेचे संस्थापक ॲड. बंड्या साने, ब्रदर जोस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या मुलांसाठी वीटभट्ट्यांवरच शाळा सुरू करण्याची मागणी केली आहे. कायद्यानुसार, मजुरांच्या मुलांसाठी त्यांच्या कामाच्या ठिकाणीच शाळा सुरू करण्याची तरतूद आहे. मात्र, दरवर्षी या नियमाची अंमलबजावणी होत नाही. मुलांना ना तात्पुरती निवारा…