Headlines

साताऱ्यात कौटुंबिक वादातून पतीने केला पत्नीचा खून:पसार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला बेड्या

सातारा शहरालगतच्या बोगदा परिसरात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी मध्यरात्री घडली. या हल्ल्यात सुनिता प्रदीप चव्हाण (वय ३५) यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर पसार होण्याच्या तयारीत असलेल्या पतीला शाहूपुरी पोलिसांनी काही तासांतच ताब्यात घेतले. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, चव्हाण दाम्पत्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होता. रविवारी रात्री अडीचच्या सुमारास…

Read More

फलटणच्या डॉक्टरची मुंबईत आत्महत्या:तानाजी सावंतांच्या कथित PAकडून दबाव असल्याचा आरोप; हातावर सुसाईड नोट!

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रूपनवर यांचा मुंबईत उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांनी सायन रेल्वे स्थानक परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला होता, त्यानंतर त्यांना तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या मृत्यूचे थेट कनेक्शन शिवसेना नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या कथित पीएशी जोडले जात असल्याने…

Read More

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली:मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल; तीव्र विषाणूजन्य संसर्ग आणि डिहायड्रेशनचा त्रास

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (88) यांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्यांना पुढील विशेष वैद्यकीय उपचारांसाठी तातडीने मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) कडक वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अण्णा हजारे यांच्यावर सुरुवातीला राळेगण सिद्धीजवळील एका स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांना तीव्र विषाणूजन्य संसर्ग आणि शरीरातील…

Read More

सैनिक सीमावर्ती भागांत दगडूशेठ गणपतीची प्रतिष्ठापना करणार:श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टतर्फे लष्कराला प्रतिकात्मक मूर्ती सुपूर्द

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने भारतीय लष्करातील जवानांसाठी गणपतीच्या प्रतिकात्मक मूर्ती सीमावर्ती भागांत पाठवल्या आहेत. कारगिल, जम्मू, अयोध्या आणि राजस्थानसह विविध सीमावर्ती भागांमध्ये सैनिक या मूर्तींची प्रतिष्ठापना करणार आहेत. पुण्यातून या मूर्ती नुकत्याच संबंधित लष्करी तुकड्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या. ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे भारतीय लष्कराच्या २४, ५, १९, १ मराठा लाइट इन्फन्ट्री युनिटच्या…

Read More

भटके विमुक्तांनी मतांची ताकद दाखवावी:ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे राज्यस्तरीय परिषदेत आवाहन

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भटके विमुक्त समाजाला आपले हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी निवडणुकीत मतांची ताकद दाखवण्याचे आवाहन केले. मतांच्या बळावरच आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा होईल, असे प्रतिपादन त्यांनी केले. ॲड. आंबेडकर हे पुणे येथे भटके विमुक्त संयोजन समिती आणि भैरव क्रांती सेना यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय भटके विमुक्त परिषदेत अध्यक्षपदावरून…

Read More

जीएमसीला दोन वर्षांत तिसऱ्यांदा नव्या डीनचा शोध:डॉ. राऊत निवृत्त; प्रभारी डीन म्हणून डॉ. स्मिता सोनटक्के पदभार स्वीकारणार

अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला (जीएमसी) अवघ्या दोन वर्षांत चौथ्यांदा अधिष्ठाता (डीन) शोधण्याची वेळ आली आहे. सध्याचे डीन डॉ. नंदकिशोर राऊत हे सोमवार, ३१ ऑगस्ट रोजी नियत वयोमानानुसार निवृत्त झाले आहेत. त्यामुळे नवे डीन नियुक्त होईपर्यंत मंगळवारपासून पुन्हा प्रभारी राज सुरू होणार आहे. डॉ. नंदकिशोर राऊत यांच्या आधी डॉ. किशोर इंगोले यांनी डीनचा पदभार सांभाळला…

Read More

मतदार यादीतून 3.53 लाख नावे वगळली; 22 मतदान केंद्रे:अमरावती जिल्ह्यात प्रारूप यादी जाहीर, दावे-हरकतींसाठी महिनाभराची मुदत

अमरावती जिल्ह्यात मतदार यादीचे सूक्ष्म पुनरिक्षण (SIR) पूर्ण झाल्यानंतर, जिल्हा प्रशासनाने सोमवारी, ३१ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर केली. या यादीनुसार, जिल्ह्यातील ३ लाख ५३ हजार २८२ मतदारांची नावे कमी झाली आहेत. विशेष म्हणजे, मतदार संख्या घटूनही एकूण मतदान केंद्रांची संख्या २२ ने वाढली आहे. या प्रारूप मतदार यादीवरील दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी…

Read More

शिंदे, कडूंच्या मध्यस्थीने मेंढपाळांचे आंदोलन स्थगित:मुंबईत पुढील आठवड्यात प्रश्नावर बैठक होणार

अमरावती: मेंढी चराई मंजुरीच्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी अमरावती जिल्ह्यातील मेंढपाळांनी २७ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार बच्चू कडू यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर हा निर्णय घेण्यात आला. या प्रश्नावर पुढील आठवड्यात मुंबईत बैठक होणार आहे. आंदोलन मागे घेण्यापूर्वी सोमवारी दुपारी मेंढपाळांनी रस्त्यावर मेंढरे आणि घोडे उभे…

Read More

अंजनगाव अग्निशमन कर्मचाऱ्यांचा आजपासून कामबंद आंदोलन:ठेकेदारावर भ्रष्टाचाराचे आरोप, प्रशासनाकडे मागण्या प्रलंबित

अंजनगाव सुर्जी येथील नगरपरिषद अंतर्गत कार्यरत अग्निशमन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी उद्या, मंगळवार, १ सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ठेकेदाराकडून वेतनासह इतर बाबींमध्ये कथित अनियमितता आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कर्मचाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांनी ठेकेदारावर गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये कागदोपत्री कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून दाखवणे, कर्मचाऱ्यांच्या वेतनातील अर्धा हिस्सा स्वतःकडे ठेवणे, कामावरून कमी करण्याची धमकी…

Read More

एसपी कदम यांच्या हस्ते होमगार्ड कॅम्पसमध्ये रस्त्याचे काम सुरू:कॅम्पसच्या विकासाला गती, जवानांसाठी सुविधा वाढवण्यावर भर

अमरावती येथील काँग्रेस नगर रोडवरील होमगार्डच्या जिल्हा प्रशिक्षण केंद्रातील विकासकामांना गती मिळाली आहे. पोलीस अधीक्षक (एसपी) निकेतन कदम यांच्या हस्ते अंतर्गत रस्त्याच्या कामाचा कार्यारंभ उत्साहात पार पडला. यावेळी परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. होमगार्ड जवानांना प्रशिक्षणादरम्यान सुरक्षित, सुसज्ज आणि चांगल्या सुविधा मिळाव्यात, हा या कामामागील मुख्य उद्देश आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर कॅम्पसमधील दळणवळण अधिक सुलभ…

Read More