Headlines

हिमंता दुसऱ्यांदा आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील:4 मंत्रीही बनतील, PM मोदींसह एनडीएचे अनेक मोठे नेते उपस्थित राहतील

हिमंता बिस्वा सरमा आज सकाळी 11 वाजता दुसऱ्यांदा आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. त्यांच्यासोबत आणखी 4 आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील. या समारंभात पंतप्रधान मोदींसह अनेक NDA शासित राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहतील. या कार्यक्रमासाठी गुवाहाटीच्या खानापारा वेटरनरी कॉलेज मैदानावर सोमवारीच तयारी सुरू झाली. रविवारी आसाममध्ये भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक झाली, यात हिमंता यांची पुन्हा विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड…

Read More

कृषीउन्नती मधूनच ग्रामोन्नती, राष्ट्रनिर्मिती साध्य होऊ शकते:ग्राम जयंती महोत्सवात प्रा.नरेंद्र राऊत यांचे प्रतिपादन‎

“शेतीच्या विकासातूनच ग्रामोन्नती, राष्ट्रोन्नती व राष्ट्रनिर्मिती साध्य होऊ शकते,” असे स्पष्ट मत नैसर्गिक शेतीतज्ज्ञ व ग्रामगीतेचे अभ्यासक प्रा. नरेंद्र राऊत यांनी व्यक्त केले. अमरावती येथील श्री गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट, राधानगर येथे ग्राम जयंतीनिमित . याप्रसंगी प्रा. राऊत यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्यातील ‘ग्रामगीता’ या ग्रंथाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, महाराजांनी ग्रामगीता ‘ग्रामनाथाला’ म्हणजेच…

Read More

अभिनेत्री तमन्ना भाटिया महाकाल मंदिरात पोहोचली:त्रिपुंड लावून भस्म आरतीमध्ये सहभागी; म्हणाली- अनुभव शब्दांत व्यक्त करू शकत नाही

साउथ आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया मंगळवारी पहाटे श्री महाकालेश्वर मंदिरात पोहोचल्या. त्यांनी भगवान महाकालच्या भस्म आरतीत सहभागी होऊन बाबांचा आशीर्वाद घेतला. पहाटे सुमारे 3 वाजता मंदिरात पोहोचलेल्या तमन्ना भाटिया नंदी हॉलमध्ये बसून भक्तिभावाने भस्म आरतीत सहभागी झाल्या. यावेळी त्या कपाळावर चंदन लावून पूर्णपणे बाबा महाकालच्या भक्तीत लीन झालेल्या दिसल्या. सुमारे दोन तास…

Read More

शालेय, वारकरी, तंत्रज्ञानाचे निःशुल्क शिक्षण:आप्पाजी महाराज वारकरी ज्ञानपीठामध्ये पाचवीच्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क प्रवेश‎

माऊली कृपांकित आप्पाजी महाराज वारकरी ज्ञानपीठ हे अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात कुऱ्हा बहिरम येथे आहे. हे राज्यातील नामवंत डिजिटल वारकरी ज्ञानपीठापैकी एक तसेच जिल्ह्यातील डिजिटल वारकरी ज्ञानपीठ आहे. ‘त्वं ज्ञानमयो, त्वं विज्ञानमयो, त्वं तंत्रज्ञानमयोसि’ या संकल्पनेवर कार्य करत विद्यार्थ्यांना वारकरी शिक्षण शालेय, शिक्षण आणि तंत्रज्ञानाचे शिक्षणाचे धडे येथे निःशुल्क दिले जात आहे. ज्ञानपीठात पाचवी…

Read More

तुटलेली खेळणी, झाडे सुकली, कचरा साचला:106 उद्यानांची कंत्राटे रखडली, दुरवस्थेमुळे ज्येष्ठ नागरिक, बंच्चे कंपनीने फिरवली पाठ‎

महानगरपालिका क्षेत्रात मनपाची २१८ उद्याने असून त्यापैकी १०६ उद्याने कंत्राटी तत्त्वावर दिली जातात. परंतु, जुने कंत्राट संपुष्टात आल्यानंतर नवी कंत्राटी प्रक्रियाच गेल्या काही वर्षांपासून रखडल्यामुळे मनपाच्या बहुतेक उद्यानांची दुर्दशा झाल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले. मोकळ्या जागेत लॉन नाही. गवतही उद्यानात दिसत नाही. फुलझाडे तर शोधूनही सापडली नाहीत. उद्यान म्हटले की सर्वत्र हिरवी झाडे, फुले, खेळणी,…

Read More

बंगालमध्ये SIR करणारे अधिकारी मुख्य सचिव बनले:काँग्रेसने म्हटले- निवडणूक आयोग आणि भाजप यांच्यात उघड संगनमत

पश्चिम बंगालमध्ये SIR करणारे निवडणूक अधिकारी मनोज अग्रवाल यांची सुवेंदु सरकारच्या काळात बंगालचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल कॅडरचे अधिकारी मनोज अग्रवाल यांच्या देखरेखीखाली विधानसभा निवडणुकांपूर्वी बंगालमध्ये मतदार यादीत विशेष सखोल सुधारणा (SIR) करण्यात आली होती. ज्या अंतर्गत मतदार यादीतून सुमारे 91 लाख मतदारांची नावे वगळण्यात आली होती. याशिवाय, निवृत्त…

Read More

आरोग्य विभागाचे बदली सत्र पूर्ण:91 कर्मचाऱ्यांची वर्णी, अमरावती जिल्हा परिषदेत आरोग्य कर्मचाऱ्यांचे स्थानांतर

जिल्हा परिषदेत सुरू झालेले बदली सत्र आज, सोमवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. दुपारपूर्वी पूर्णत्वास गेलेल्या या अभियानात आरोग्य विभागातील ९१ कर्मचाऱ्यांचे स्थानांतर करण्यात आले. आरोग्य विभागातील सन २०२६ च्या सर्वसाधारण बदली प्रक्रियेनुसार विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करावयाच्या होत्या. त्यानुसार आज सकाळी डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात प्रक्रिया पार पडली. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली…

Read More

एसटी कर्मचाऱ्यांचा असाही प्रामाणिकपणा:महिला प्रवाशाचे दोन लाखांचे दागिणे, रोख रक्कम सुखरूप परत‎

प्रवाशांकडून अनेकदा एसटी कर्मचाऱ्यांच्या उद्धट वर्तणुकीबाबत तक्रारी होत असताना, अंजनगाव सुर्जी येथील एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रामाणिकपणाचे आणि कर्तव्यदक्षतेचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे. परतवाडा आगाराच्या बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेची अंदाजे दोन लाख रुपये किमतीची सोन्याची पोत व रोख रक्कम हरवली होती. मात्र, वाहक व चालकाच्या सतर्कतेमुळे हा मौल्यवान ऐवज महिलेला सुखरूप परत मिळाला. १०…

Read More

शहरातील वाहतुकीच्या गंभीर समस्येवर उपाययोजना हव्यात, उपमहापौरांचे पोलिस आयुक्तांना निवेदन, कारवाईची मागणी‎

शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून मुख्य चौक, बाजारपेठा, शाळा परिसरात आणि मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच मोठ्या संख्येने वाहतूक नियमांचे पालन होत नसल्यामुळे अपघातांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. या बरोबरीनेच शहरातील अनेक चौकांमध्ये वाहतूक पोलिसांची उणीव असल्याने नागरिकांना…

Read More

अकोला-वाशीम जिल्ह्यातील 835 सोसायट्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करू‎:जिल्हा सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. जयराज कोरपे यांची माहिती‎

“सेवा सहकारी सोसायटी हा ग्रामीण सहकार व्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे अकोला आणि वाशीम जिल्ह्यातील सर्व सेवा सहकारी सोसायट्या आर्थिक, तांत्रिक आणि प्रशासकीयदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत,’ असे प्रतिपादन अकोला-वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. जयराज कोरपे यांनी केले. रविवार, १० मे रोजी सेवा सहकारी सोसायटी, मनब्दा यांच्या नवीन सुसज्ज इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत…

Read More