पुण्यात अमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोघांना अटक:26 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त
विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एम.डी. (मेफेड्रोन) या अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 26 लाख 71 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विमानतळ पोलिस ठाण्याचे तपास पथक गस्त घालत असताना, पोलिस शिपाई हरी पुंडे आणि लालू कन्हे यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली. खराडी बायपास चौकातून फॉरेस्ट पार्ककडे जाणाऱ्या…