खवड्या डोंगर आत्महत्या प्रकरण:दोन्ही कुटुंबांचा तक्रारीस नकार; चांदगुडे कुटुंबाचे मृत्यूचे गुढ कायम, आई-वडिलांना एकत्र आणण्यासाठी कुणालची धमकी, मावशीचा दावा
खवड्या डोंगरावर चांदगुडे कुटुंबातील तिघांनी जीवन संपवल्याच्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. एमआयडीसी वाळूज पोलिसांनी बुधवारी मृत मुरलीधर आणि संगीता यांच्या आई-वडील व प्रत्येकी तीन बहिणींचे सविस्तर जबाब नोंदवले. मात्र, ‘आत्महत्येचे नेमके कारण त्या तिघांनाच माहिती’ असे सांगत दोन्ही कुटुंबांनी एकमेकांविरुद्ध तक्रार देण्यास नकार दिला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी…