Headlines

भास्कर काळे यांच्या 'बुद्धिस्ट सर्किट' पुस्तकाचे प्रकाशन:पुण्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या ओएसडींच्या हस्ते सोहळा

प्रख्यात कवी आणि साहित्यिक भास्कर काळे यांच्या ‘बुद्धिस्ट सर्किट: ऊर्जेचे प्रेरणा केंद्र!’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पुणे येथील स्वारगेट येथे पार पडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात भास्कर काळे यांनी तथागत भगवान बुद्ध यांच्या ऐतिहासिक स्थळांना दिलेल्या भेटी आणि त्यातून आलेले अनुभव कथन…

Read More

माजी नगरसेवक शेडगेला आत्महत्या प्रकरणात दिलासा:उच्च न्यायालयाचे पुढील सुनावणीपर्यंत सक्तीची कारवाई न करण्याचे निर्देश

गुलटेकडी येथील बांधकाम कंत्राटदार खलील शेख यांच्या आत्महत्या प्रकरणात आरोपी माजी नगरसेवक बाळासाहेब शेडगे यांना उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला आहे. पुढील सुनावणीपर्यंत शेडगे यांच्याविरुद्ध कोणतीही सक्तीची कारवाई करू नये, असे निर्देश न्यायमूर्ती माधव जामदार यांनी पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २ सप्टेंबर रोजी होणार आहे. या गुन्ह्यात बाळा शेडगे यांनी उच्च न्यायालयात…

Read More

पुणे शहरात दोन अपघातांत दोघांचा मृत्यू:मांजरी आणि वाघोली परिसरात घडल्या घटना

पुणे शहरात शनिवारी दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. पुणे-सोलापूर महामार्गावरील मांजरी आणि अहिल्यानगर महामार्गावरील वाघोली परिसरात या घटना घडल्या. पहिला अपघात मांजरी येथील महादेवनगर परिसरात सकाळी नऊच्या सुमारास झाला. येथे एका ट्रकने दुचाकीस्वाराला धडक दिली, यात अमित रमेश अवताडे (वय २४, रा. लोणी काळभोर) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रक चालक चंद्रकांत महादेव काळे…

Read More

शिरवळमध्ये दोन गुन्ह्यांचा छडा:अल्पवयीनांच्या मदतीने सराईत आरोपीपर्यंत पोलिसांची मजल

शिरवळ परिसरात घडलेल्या घरफोडी आणि जबरी चोरीच्या दोन स्वतंत्र घटनांचा छडा लावण्यात शिरवळ पोलिसांना यश आले आहे. तपासादरम्यान दोन अल्पवयीन मुलांसह तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या ताब्यातून दोन दुचाकींसह तब्बल ३ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शिरवळच्या दत्तनगर परिसरात १२ ऑगस्ट रोजी बंद घराला लक्ष्य करण्यात आले होते. घरातील…

Read More

चाकणमध्ये दोन 10 एमव्हीए रोहित्रे कार्यान्वित:महावितरण संचालकांनी वीज यंत्रणेची पाहणी करत उपाययोजनांना गती दिली

चाकण औद्योगिक क्षेत्रातील ग्राहकांना अखंडित आणि विश्वासार्ह वीजपुरवठा मिळावा, यासाठी महावितरणने वीज यंत्रणा सक्षम करण्याच्या उपाययोजनांना गती दिली आहे. महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी चाकण एमआयडीसी परिसरातील वीजपुरवठा यंत्रणेची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. यावेळी ३३/२२ केव्ही भांबोली आणि ह्युंदाई उपकेंद्रांमध्ये प्रत्येकी १० एमव्हीए क्षमतेची दोन रोहित्रे कार्यान्वित करण्यात आली. या अतिरिक्त रोहित्रांमुळे चाकण…

Read More

नागपुरात 4 हजार तरुणांनी ढोल-ताशा वादनाचा विश्वविक्रम केला:एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद; 585 ध्वजधारकांचा सहभाग

नागपूरमध्ये रविवारी ढोल-ताशा वादनाचा एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ४ हजारांहून अधिक तरुण-तरुणींनी एकत्र येऊन ढोल आणि ताशा वाजवले. या भव्य सांस्कृतिक महासंगमाची ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये अधिकृतपणे नोंद झाली आहे. हा विक्रम ‘जेनझी संवाद’ कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आला होता. विदर्भातील विविध शहरांमधून २०० हून अधिक ढोल-ताशा पथकांना एकाच…

Read More

खड्ड्यांमुळे मृत मुलाच्या कुटुंबाला 6 लाखांची भरपाई द्या:स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची आयुक्तांना सूचना

सूस-म्हाळुंगे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात एका दहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. या मुलाच्या कुटुंबाला तातडीने सहा लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी सूचना पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना केली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करत, महापालिकेने स्वतःहून हे प्रकरण संबंधित समितीसमोर मांडावे आणि नुकसानभरपाईची प्रक्रिया त्वरित…

Read More

मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते नागपुरात पार्थिव शिवलिंग निर्मिती:मानकापूरमधील सोहळ्यात हजारो भाविकांची उपस्थिती, 91 लाखांचा संकल्प

नागपूरच्या मानकापूर येथे आयोजित पार्थिव शिवलिंग निर्मिती सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहभाग घेतला. त्यांनी स्वतः मातीची शिवलिंगे तयार करून महादेवाचे दर्शन घेतले. या सोहळ्याला हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती. मानकापूर येथील शिवमंदिर परिसरात हा भव्य उपक्रम तिसऱ्यांदा आयोजित करण्यात आला आहे. १३ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीत चालणाऱ्या या महिनाभराच्या सोहळ्यात यंदा ९१…

Read More

सातारा गुन्हेगारी वार्ता:इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह व्हिडीओवरून साताऱ्यात गुन्हा

सोशल मीडियावर हिंदू धर्मीयांच्या धार्मिक भावना दुखावतील, असा आक्षेपार्ह मजकूर असलेला व्हिडीओ प्रसारित केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणे नऊच्या सुमारास पोवई नाका परिसरात असताना ‘Adorable Vidzee’ आणि ‘Insta Satara’ या इन्स्टाग्राम खात्यांवरून संबंधित व्हिडीओ प्रसारित झाल्याचे निदर्शनास आले. तक्रारीनुसार, व्हिडीओमध्ये हिंदू धर्मीय…

Read More

मुंबईतील मोकळ्या मैदानांसाठी आदित्य ठाकरेंचे 'तिरंगा आंदोलन':अनेक भूखंड गिळंकृत केल्याचा आरोप; मुख्यमंत्र्यांच्या युवासंवादावरही साधला निशाणा

मुंबई येथील नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदानावर आज तिरंगा आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईमधील जी मोकळे मैदान होती, ती पुन्हा एकदा मुलांसाठी मोकळी उपलब्ध मिळायला हवीत या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी हे आंदोलन केले. यावेळी बोलताना त्यांनी भाजप तसेच महायुती सरकारवर टीका केली आहे. सभेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, आज आपण…

Read More