वृद्ध कलावंतांची निवड वर्षभरापासून रखडलेलीच:जुलै 2025 मध्ये अर्ज केलेल्यांसाठी बैठक केव्हा घेणार, संबंधितांचा सवाल
अमरावती जिल्ह्यातील राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेसाठी अर्ज केलेल्या शेकडो वृद्ध कलावंतांची निवड प्रक्रिया वर्षभरापासून रखडली आहे. निवड समितीची बैठक न झाल्याने मानधनही मिळालेले नाही. यामुळे कलावंतांमध्ये नाराजी असून, तातडीने बैठक घेऊन निवड जाहीर करण्याची मागणी होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राबवल्या जाणाऱ्या या योजनेअंतर्गत दरमहा ५ हजार…