पुणे मनपात राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजपविरोधात ठिय्या आंदोलन:आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कामांच्या चौकशीमुळे विकास निधी शून्य केल्याचा निषेध
पुणे मनपा येथे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपविरोधात ठिय्या आंदोलन केले. कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कामांची चौकशी करण्याच्या प्रस्तावामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांचा विकास निधी भाजपने शून्य केल्याचा आरोप करत हा निषेध व्यक्त करण्यात आला. स्थायी समितीचे सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरे यांनी चंद्रकांत…