कानडगावच्या शाळा कामासाठी मंदिरामधील दानपेटी केली खुली:ग्रामस्थांचा पुढाकार, 26 हजारांचा निधी शाळेच्या रंगरंगोटीसाठी सुपूर्द
तालुक्यातील कानडगाव येथील ग्रामस्थांनी ग्रामदैवत सटवाई देवीच्या मंदिराची दानपेटी उघडून त्यातील जमा रक्कम गावातील जिल्हा परिषद शाळेच्या विकासकामांसाठी सुपूर्द केली. येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग भरतात. शाळेत चार वर्गखोल्य . या खोल्यांची रंगरंगोटी करणे आणि विद्यार्थ्यांना अभ्यासात रुची निर्माण व्हावी यासाठी बोलक्या भिंती तयार करण्यासाठी निधीची आवश्यकता होती. शाळा प्रशासनाने लोकसहभागाचे…