Headlines

हृदयद्रावक:शाळेला दांडी मारून पोहायला गेलेल्या भावंडांचा बुडून मृत्यू, मुंबईच्या आरे कॉलनी परिसरातील घटना

गणवेश परिधान करून घरातून निघालेल्या, पण शाळेत न पोहोचता पोहण्याच्या मोहात पडलेल्या दोन निष्पाप बालकांचा मुंबईत दुर्दैवी अंत झाला. गोरेगाव पूर्वेतील आरे कॉलनी परिसरात ही घटना घडली असून, तबेल्यातील पाण्याच्या टाकीत बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. झैब पटेल (१५) आणि नकीब पटेल (१३) अशी या दुर्दैवी मृत भावंडांची नावे आहेत. झैब इयत्ता १०…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:विधानसभेत विजयाच्या फरकापेक्षा कट होणारे मतदार 30 ते 460 पट जास्त; 2029 च्या विधानसभेला 288 पैकी किमान 120 मतदारसंघांत ‘एसआयआर’ प्रभावी ठरण्याची शक्यता

निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेअंतर्गत राज्यातील २ कोटी ७ लाख मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघांचा १८ ऑगस्ट रोजी जारी एसआयआरचा डेटा असे सांगत आहे की, वगळल्या जाणाऱ्यांचा मुद्दा किमान १२ . २०२४ मध्ये २२ मुस्लिम मबहुल मतदारसंघांत महायुती १३ जागी विजयी एसआयआरमुळे २२ प्रमुख मुस्लिमबहुल मतदारसंघांचे चित्र बदलणार असे…

Read More

दिव्य मराठी विशेष:मज्जा येईल तोपर्यंत काम करत राहा, कंटाळा आला की रिटायर व्हा- अभिनेते प्रशांत दामले

नाट्य महोत्सवाच्या निमित्ताने सोलापूरमध्ये आलेले ‘विक्रमवीर’ अभिनेते प्रशांत दामले यांची प्रकट मुलाखत प्रसिद्ध मुलाखतकार अनीश सहस्रबुद्धे यांनी घेतली. नाट्य क्षेत्रातील पदार्पणापासून ते १३ हजारांहून अधिक प्रयोगाच्या विक्रमापर्यंतचा प्रवास दामले यांनी यात उलगडला. सोलापुरी बाराबंदी वेशभूषेत प्रशांत दामले हे मुलाखतीसाठी व्यासपीठावर आले. दामले यांच्या मुलाखतीचा हा संपादित भाग… १३,५५२ नाट्यप्रयोगांचा टप्पा ओलांडलात, ही सुरुवात कशी झाली?…

Read More

राहुल गांधींच्या पुण्यातल्या कार्यक्रमापूर्वी तणाव:'एनएसयूआय' आणि 'एबीव्हीपी' कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा; 'छात्रों की गुंज' कार्यक्रम उद्या

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा ‘छात्रों की गुंज’ हा कार्यक्रम शनिवारी (दि. 22) पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. शिवाजीनगर येथील ‘एसएसपीएमएस’ प्रशालेच्या मैदानावर दुपारी साडेचार ते रात्री साडेनऊ या वेळेत हा कार्यक्रम पार पडणार आहे. पुणे पोलिसांनी या कार्यक्रमाला काही अटी आणि शर्तींसह परवानगी दिली असून, कार्यक्रमस्थळी कोणतेही आक्षेपार्ह फलक, चित्र लावू नयेत तसेच धार्मिक…

Read More

अकरावी प्रवेशासाठी विशेष फेरी जाहीर:23 ऑगस्टपासून नोंदणी सुरू, अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी अंतिम संधी

शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इयत्ता 11 वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अद्याप प्रवेश निश्चित न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले असून, विद्यार्थ्यांनी या अंतिम फेरीत प्रवेश निश्चित करून घेण्याचे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने केले आहे. संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 15,52,678 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून 13,43,418 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले…

Read More

अक्षय कुमार 1 महिन्यात दुसऱ्यांदा पडता पडता वाचला:सैफ अली खानने सावरले; उघड्या दरवाजामुळे संतुलन बिघडले

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार पुन्हा एकदा पडता पडता वाचला आहे. अक्षय आणि सैफ अली खान त्यांच्या आगामी ‘हैवान’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर एकत्र पोहोचले होते. याच दरम्यान पापाराझींना पोज देत असताना अक्षय कुमारच्या मागे असलेला दरवाजा उघडला, ज्यामुळे त्याचा तोल गेला आणि तो पडता पडता वाचला. जवळच उभ्या असलेल्या सैफ अली खानने त्याला…

Read More

शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का!:माजी महापौर विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र रद्द, शिंदे गटाला लॉटरी लागण्याची शक्यता

मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला असून, दादर परिसरातील नगरसेविका आणि मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. पालघर उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेले हे जात प्रमाणपत्र सक्षम प्राधिकाऱ्याने दिले नसल्याचे जातपडताळणी समितीने नमूद केले आहे. त्यामुळे आता त्यांच्या नगरसेवकपदावर टांगती तलवार निर्माण झाली असून, त्यांच्या पदाबाबतचा अंतिम निर्णय पालिका…

Read More

मोशी कचरा डेपोत 9 मृत्यू; नवा बायोगॅस प्रकल्प:780 कोटींच्या 16 वर्षांच्या प्रकल्पावरून महापालिकेत राजकीय संघर्ष

मोशी कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात नऊ जणांचा मृत्यू झाल्यानंतर कचरा व्यवस्थापनातील त्रुटींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याच मोशी डेपोमध्ये दररोज ३७५ मेट्रिक टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅस निर्मितीचा आणखी एक प्रकल्प उभारण्याचा पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे. हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (डीबीएफओटी) तत्त्वावर १६ वर्षांसाठी प्रस्तावित आहे. यासाठी महापालिकेच्या तिजोरीवर सुमारे…

Read More

Ori Slams Akanksha Chamola Over Gaurav Khanna Divorce Controversy

5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ओरीने गौरव खन्नाला घटस्फोट देण्याच्या प्रकरणात आकांक्षा चमोलावर निशाणा साधला आहे. ओरी (ओरहान आवत्रामाणी) ने आकांक्षा चमोलाला ‘आस्तीनचा साप’ म्हटले आहे. एका इंस्टाग्राम पोस्टवर कमेंट करताना ओरीने लिहिले की, आकांक्षा तिच्या पती गौरवच्या नावाचा वापर फक्त व्ह्यूज आणि रीच वाढवण्यासाठी करत आहे. हा वाद तेव्हा सुरू झाला जेव्हा…

Read More

कारागृहातील कैदी साकारत आहेत पर्यावरणपूरक गणेश मूर्ती:परिवर्तनाचा संदेश देत समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा प्रयत्न

कारागृहातील बंदी बांधवांनी यंदा पर्यावरणपूरक शाडू मातीपासून श्री गणेशमूर्ती साकारल्या आहेत. कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान-पुणे आणि आदर्श मित्र मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यामागे बंदी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा आणि त्यांच्यातील सकारात्मक बदल घडवण्याचा उद्देश आहे. ‘प्रेरणापथ’ या उपक्रमांतर्गत बंदी बांधवांना गणेशमूर्ती निर्मितीचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमाचा…

Read More