छत्रपती संभाजीनगर हादरले:आत्महत्या करणाऱ्या मुलाला वाचवताना वडिलांचा मृत्यू; धक्का बसलेल्या आईनेही मारली उडी
छत्रपती संभाजीनगर शहरात आज एक अंगावर काटा आणणारी घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या करण्याच्या उद्देशाने डोंगरावर गेलेल्या १८ वर्षीय मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याच्या वडिलांचा दरीत कोसळून मृत्यू झाला. तर, आपल्या डोळ्यांदेखत नवरा आणि मुलाचा झालेला करुण अंत पाहून तीव्र धक्का बसलेल्या आईनेही त्याच डोंगरावरून उडी मारून जीवन संपवले. एकाच कुटुंबातील तिघांच्या अशा दुर्दैवी अंत झाल्याने…