Headlines

नोकऱ्या कुठून मिळणार, हा तरुणांचा प्रश्न- ठाकरे:जंतर-मंतर आंदोलनाने सरकारविरुद्ध बोलण्याची हिंमत दिली




दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘जेन झी’च्या आंदोलनापूर्वी सर्वसामान्य नागरिक सरकारविरोधात बोलायला, प्रश्न विचारायला घाबरत होते. मात्र, दिल्लीतील आंदोलनाने देशातील लोकांना सरकारविरोधात बोलण्याची हिंमत दिली. ही महत्त्वाची ताकद आता देशभरात पाहायला मिळत आहे. लोकांचा संताप बाहेर पडत असून ‘नोकऱ्या कुठे मिळणार?’ हा या तरुणाईपुढील सर्वांत मोठा प्रश्न असल्याचे शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी (३ सप्टेंबर) सांगितले. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्याच्या विकासासाठी जाहीर करण्यात आलेल्या विविध प्रकल्पांची सद्य:स्थिती, निधी, अंमलबजावणीतील विलंब आणि विकासातील अनुशेष यावर ‘विकासाला विलंब म्हणजे विकासाला नकार!’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांची उपस्थिती होती. आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, येत्या १० ते १२ वर्षांत जगभरात १२० कोटी तरुण रोजगाराच्या बाजारात येतील; परंतु सध्याच्या ट्रेंडनुसार केवळ ४० कोटी नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. उर्वरित ८० कोटी तरुणांचे काय होणार, हा गंभीर प्रश्न आहे. दिल्ली येथील आंदोलनानंतर बदललेल्या परिस्थितीबद्दल ठाकरे म्हणाले की, जंतर-मंतर आंदोलनाचा प्रभाव मान्य करावेच लागेल. ‘विकास, तुमसे ना हो पाएगा!’ मुक्तिसंग्राम दिनानिमित्त विकासासाठी तसेच अनुशेष भरून काढण्यासाठी विविध सरकारांनी छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाच्या बैठका घेऊन अनेक घोषणा केल्या होत्या. यांची स्थिती जनतेसमोर मांडण्यासाठी पक्षाच्या वतीने ‘मराठवाड्याचा विकास, तुमसे ना हो पाएगा!’ या घोषवाक्याखाली १ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२६ दरम्यान जनआंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. उद्धवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी ‘विकासाला विलंब म्हणजे विकासाला नकार’ या कार्यक्रमात मराठवाड्याच्या विकासासाठी जाहीर केलेल्या विविध प्रकल्पांची सद्य:स्थिती मांडली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *