Headlines

संभाजीनगरात अग्निशमन लॅडरसाठी 30 कोटी खर्च:70 मीटर लॅडर, नागपूरला मेंटेनन्स 29 लाख, संभाजीनगरात 15 कोटी, संभाजीनगर मनपा 12 कोटी जास्त देणार




शहरातील खड्डे बुजवण्यासाठी मनपाकडे पैसे नाहीत. मात्र, ज्या इमारती अजून तयारच झालेल्या नाहीत, त्यांची आग नियंत्रणात आणण्यासाठी 30 कोटी रुपयांची उधळपट्टी सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. अग्निशमन दलासाठी 70 मीटरची हायड्रॉलिक लॅडर खरेदी करताना तब्बल 30 कोटी रुपयांचा खर्च करण्याची तयारी महापालिकेने केली आहे. मनपाने 26 सप्टेंबर 2024 रोजी लॅडर पुरवठा करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या. या निविदा 26 सप्टेंबर 2024 रोजी उघडण्यात आल्या. विशेष म्हणजे, देशातील सर्वच महानगरपालिकांकडे फिनलंडमधील ‘ब्रोंटो स्कायलिफ्ट’ या कंपनीच्याच लॅडर असून ‘ब्रिजवासी’ नावाचा डीलर आहे. या खरेदीची तुलना देशातील इतर महापालिकांच्या 70 ते 90 मीटरच्या लॅडरशी केली असता, संभाजीनगरच्या टेंडरमधील खर्चाचा आकडा मोठा दिसतो. नागपूर महापालिकेने 70 मीटरच्या लॅडरसाठी 5 वर्षांच्या देखभालीपोटी अवघे 28.95 लाख रुपये दिल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे, छत्रपती संभाजीगनर मनपाच्या हिशेबानुसार, मेंटेनन्स खर्चात 4.4 कोटी कस्टम ड्यूटी आणि 2.5 कोटी हँडलिंग चार्जेस यांचा समावेश आहे. त्याचबरोबर कंपनी 10 वर्षे देखभाल-दुरुस्ती करणार असल्याचे स्पष्ट करताना त्यामध्ये 3 वर्षे वॉरंटीची असल्याचे सांगण्यात येत आहे. नाशिकमध्ये 90 मीटरची लॅडर 32 कोटी रुपयांत नाशिक महापालिकेची 90 मीटरची लॅडर सुमारे 32.26 कोटी रुपयांत दाखल होत आहे. या लॅडरची क्षमता संभाजीनगरच्या 70 मीटरच्या लॅडरपेक्षा जास्त आहे. मुंबईत 90 मीटरच्या लॅडरसाठी सुमारे 22 ते 25 कोटी रुपयांच्या आसपास खर्च केला आहे. ठाण्यात 90 मीटरची लॅडर सुमारे 23 कोटी रुपयांत 5 वर्षांच्या देखभालीसह कार्यरत आहे. किमतीची कंपनीकडे विचारणा इतर शहरे व आपल्या लॅडरच्या किमतीतील फरक दिव्य मराठी’ने निदर्शनास आणून दिले. याबाबत कंपनीला विचारणा केली आहे. 15 कोटींमध्ये मेंटेनन्स, वॉरंटी आहे. त्यात 4.40 कोटी कस्टम ड्युटी, तर 2.50 कोटी हँडलिंग चार्ज आहे. – अमोल कुलकर्णी, प्रमुख, यांत्रिकी विभाग, मनपा 22 मजली इमारतीच नाहीत; मग 70 मीटरची लॅडर आताच का? शहरात सध्या 22 मजल्यांपेक्षा अधिक उंच इमारतींना मंजुरी देणे सुरू केले आहे. प्रत्यक्ष बांधकाम पूर्ण होण्यासाठी साधारण 3 ते 5 वर्षांचा कालावधी लागू शकतो. सध्या शहरात 12 मजल्यांपर्यंत पोहोचणारी लॅडर महापालिकेने नुकतीच सुमारे 15 कोटी रुपयांत खरेदी केली आहे. असे असताना लगेचच 70 मीटर म्हणजे सुमारे 24 ते 25 मजल्यांपर्यंत पोहोचणारी लॅडर 30 कोटी रुपयांना खरेदी करण्याची घाई का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. भविष्यातील गरज लक्षात घेऊन खरेदी करणे योग्य असले तरी त्यासाठी आजच 30 कोटी रुपये खर्च करण्याची आर्थिक आवश्यकता आणि टेंडरची रचना तपासण्याची मागणी होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *