![]()
शहरानजीकच्या हिवरखेडा-गौताळा परिसरातील श्री क्षेत्र श्री नित्यानंद धाम संस्थान राम मंदिराच्या स्वयंपाकघरात ७ फूट लांबीचा भारतीय अजगर आढळून आला. माहिती मिळताच सर्पमित्र अनिल शिरसे यांनी घटनास्थळी धाव घेत या अजगराला पकडले. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी टोंपे यांच्या उपस्थितीत अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडले. सर्पमित्र अनिल शिरसे म्हणाले, भारतीय अजगराला इंडियन रॉक पायथॉन किंवा दगडी अजगर असे म्हणतात. ही भारतातील सर्वात मोठ्या प्रजातींपैकी एक असून ती बिनविषारी आहे. गौताळा अभयारण्य नजीक असल्याने नाग, मण्यार, घोणस, फुरसे व अजगर यांसारखे साप परिसरात आढळतात. त्यामुळे साप दिसल्यास घाबरून न जाता सर्पमित्र, वनविभागाशी संपर्क साधावा. यावेळी उमा सोनवणे, बापू गवळी, श्रीकृष्ण बडग यांच्यासह सर्पप्रेमी उपस्थित होते.
Source link
हिवरखेडा-गौताळ्याच्या राम मंदिराच्या स्वयंपाकघरात आढळला 7 फूट अजगर:सर्पमित्र अनिल शिरसे, वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी टोंपे यांनी दिले जीवदान