![]()
लासलगाव लासलगाव विद्या प्रसारक मंडळाच्या सरस्वती बालक मंदिर व सरस्वती विद्यामंदिर यांच्या वतीने गोपाळकाला निमित्त दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. सरस्वती बालक मंदिरातील शिवांश रोहम, शिवराई महाले, शिरीष क्षीरसागर, श्रावणी वाकचौरे, स्वरूप शिंदे, सृष्टी गवळी व शिवराज दरगुडे या बालगोपालांनी श्रीकृष्ण, राधा, नंदराज, वासुदेव, यशोदा, देवकी, सुदामा व गवळण यांच्या वेशभूषा साकारून उपस्थितांची मने जिंकली. ‘कृष्ण जन्मला ग बाई, कृष्ण जन्मला’ या गीतावर बालगोपालांनी आकर्षक नृत्याविष्कार सादर केला. इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी कृष्ण जन्मोत्सवावर आधारित नाटिका तसेच गीत गायन सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. शिक्षिका रूपाली शिंदे यांनी गोपाळकाला सणाचे महत्त्व व श्रीकृष्णाच्या बाललीलांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. मुख्याध्यापक भीमराव शिंदे यांनी कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले. सूत्रसंचालन ओम आघाव या विद्यार्थ्याने केले. कार्यक्रमासाठी उर्मिला खोकले, सारिका बोराडे, लता मोरे, शिक्षकवृंद व पालकवर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.
Source link
‘गोविंदा आला रे…’च्या जयघोषात भाक्षीत विद्यार्थ्यांनी फोडली दहीहंडी:बाललीला व गोपाळकालाचे मनोहारी सादरीकरणाने वेधले लक्ष