![]()
वाशी तालुक्यातील बोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यार्थी संख्येअभावी अस्तित्वाच्या संकटात असताना शिक्षक दाम्पत्याने ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळेला नवसंजीवनी देण्याचा विडा उचलला आहे. शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे शाळ
.
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर बोरी गाव असून कमी लोकसंख्या असलेल्या या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात केवळ आठ विद्यार्थी शिक्षण घेत होते. शाळा सुरू ठेवण्यासाठी किमान २१ विद्यार्थ्यांची आवश्यकता असल्याने शाळेचे अस्तित्व टिकविण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते.
वर्गणीतून शाळेचा कायापालट शिक्षकांसह शिक्षणप्रेमी ग्रामस्थांनी एकत्र येत लोकवर्गणी जमा करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या. प्रत्येक वर्गात लाईट व पंखे बसविण्यात आले. प्रांगणातील खड्डे बुजवून परिसराची दुरुस्ती करण्यात आली. रोटरी क्लबच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्यासाठी टाकी उपलब्ध करून देण्यात आली असून, ग्रामस्थांच्या बोअरवेल मधून पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच पेव्हर ब्लॉक बसवण्यासह संपूर्ण शाळेची रंगरंगोटी करण्यात आली.