![]()
देवदर्शनासाठी मुंबईतील घाटकोपरहून नाशिकला आलेल्या ११ वर्षीय मुलाचा रामकुंडात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. ५) सकाळी ८.३० च्या सुमारास घडली. गोपाल गुप्ता (११) असे या मृत मुलाचे नाव आहे. ज्या दिवशी घरोघरी ‘गोपालकाला’ साजरा केला जात होता त्याच दिवशी काळाने चिमुक्या गोपालला मृत्यू झाला. घाटकोपर येथून ४० भाविकांचा गट ट्रॅव्हल बसने नाशिक, शिर्डी, शनी शिंगणापूर आणि वणी गड दर्शनासाठी निघाला होता. नियोजनानुसार हे सर्व भाविक शनिवारी सकाळी नाशिकमध्ये दाखल झाले. तपोवन परिसरात दर्शन घेऊन गाडीतून उतरल्यानंतर महिला व इतर नातेवाईक नित्यकर्म आणि दर्शनाची तयारी करत होते. यादरम्यान, गोपाल आणि त्याचे इतर मावसभाऊ रामकुंडाच्या काठावर खेळत होते. या वेळी गोपाल पाण्यात उतरला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. गोपाल यही रह गया रुग्णालयाच्या आवारात आईने “मेरा गोपाल यही रह गया” असा फोडलेला हंबरडा उपस्थित सर्वांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. या दुर्दैवी घटनेने भाविकांचा देवदर्शनाचा आनंद क्षणात दु:खात बदलला.
Source link
नाशिकला गाेपाळकाल्याच्या दिवशीच मुंबईच्या गाेपालचा रामकुंडात बुडून मृत्यू:तपोवन परिसरात कुटुंबीय देवदर्शनाची तयारी करत असताना काळाचा घाला