Headlines

तलावात बुडून तरुणाचा मृत्यू:गौताळा हिवरखेडा येथील घटना, 25 फूट पाण्यातून मृतदेह काढला‎




तालुक्यातील हिवरखेडा गौताळा येथील राम मंदिराजवळील तलावात बुडून मनोज काशिनाथ गायकवाड (२८, रा. हिवरखेडा गौताळा) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. अग्निशामक दलाच्या रेस्क्यू पथकाने त्यांचा मृतदेह तलावातून बाहेर काढला. , मनोज गायकवाड हे शुक्रवारपासून बेपत्ता होते. शुक्रवारी रात्री उशिरा गौताळा तलावाच्या काठावर त्यांचे कपडे आढळून आल्याने ते तलावात बुडाल्याची शंका उपस्थित झाली. मात्र, रात्र झाल्यामुळे शोधमोहीम राबवणे शक्य झाले नाही. शनिवारी सकाळी कन्नड नगरपरिषद आणि छत्रपती संभाजीनगर येथील अग्निशामक दलाच्या रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात आले. मुख्याधिकारी रवींद्र लांडे व नगराध्यक्ष फरीन बेगम अब्दुल जावेद यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद व अग्निशमन पथकाने गाळात फसलेला मनोज यांचा मृतदेह बाहेर काढला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *